Manoj Jarange Patil | मनोज जरांगेंची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले – छगन भुजबळ आणि एकनाथ शिंदे एकाच बाजारातले, त्यांच्याविषयी…

जालना : Manoj Jarange Patil | भुजबळ आणि शिंदे एकाच बाजारातले आहेत. त्यांच्याविषयी काही बोलायचं नाही. ते काय आहेत? हे सगळ्या राज्याला माहीत आहे. भुजबळांचा विषय तर चिल्लर झालाय. ते बारीक लेकरासारखं काहीही बोलायला लागलेत. बहुतेक त्यांचा आणि वयाचा ताळमेळ बसत नाही. ते बरळल्यासारखं करायला लागलेत, अशी थेट टीका मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केली आहे.

जालन्यातील सभेपूर्वी जरांगे पाटील यांनी ही टीका केली. भुजबळ तुमच्यावर टीका करत असले तरी एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) तुमच्या संपर्कात होते, सरकारकडून काही प्रतिसाद मिळाला का? या प्रश्नावर जरांगे यांनी वरील उत्तर दिले.

अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मनोज जरांगे यांच्या सभेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. १०० एकरात होणाऱ्या सभेसाठी ७ ते ८ कोटी रुपये खर्च येतो, एवढे पैसे कुठून आले? असे भुजबळ यांनी म्हटले होते. यावरून मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व छगन भुजबळ यांच्यावर थेट हल्लाबोल केला. (Manoj Jarange Patil)

भुजबळांवर टीका करताना जरांगे म्हणाले, एवढ्या मोठ्या माणसाने (छगन भुजबळ) असे बोलायला नाही पाहिजे
आणि आमच्यासारख्या सामान्य शेतकऱ्यांच्या लेकरांविरुद्ध तर बोलायलाच नाही पाहिजे.
कोटी ही गोष्टच आम्हाला माहीत नाही आणि तुम्ही ५० कोटींबद्दल बोलत आहात.
पण कोटी ही तुम्हाला माहीत आहेत, म्हणून तुम्ही आतमध्ये (तुरुंगात) जाऊन बेसन खाऊन आलात.

सरकारला इशारा देताना जरांगे म्हणाले, आजपासून सरकारच्या हातात फक्त दहा दिवस आहेत.
आम्हाला दहा दिवसांनी आरक्षण पाहिजे. कारण आरक्षण आमच्या हक्काचे आहे. ही वेदना आहे, सभा नाही.
प्रचंड पैसा घालवूनही मराठा समाजातील मुले सुशिक्षित बेकार म्हणून जगत आहेत.
प्रचंड शिकूनही मराठा समाजाच्या मुलांचा नोकरीतला टक्का कमी झालाय.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Police Inspector Promotion ACP / DySP | राज्यातील 104 वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना सहाय्यक पोलिस आयुक्त / पोलिस उपअधीक्षक पदी बढती

Sasoon Hospital Drug Racket | ससून प्रकरणामध्ये राज्य सरकारकडून स्थापित समितीची चौकशी सुरु; रुग्णालयातील अधिष्ठाता पासून शिपाईपर्यंत सर्वांची कसून चौकशी

Mula Mutha Riverfront Development | सांगवी ते वाकड मुळा नदीकाठ सुधार योजनेसाठी तीन कंपन्यांच्या निविदा आल्या

Maratha Reservation | मराठा आरक्षणासाठी आज जालन्यात उसळणार जनसागर, गर्दीचा विक्रम मोडणार, जरांगे यांच्या भाषणाकडे लक्ष