Manoj Jarange Patil | पवारांच्या बालेकिल्ल्यात मनोज जरांगे पाटलांची सभा, जरांगे पाटलांच्या आंदोलनाला राज्यातून मोठा प्रतिसाद

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – Manoj Jarange Patil | मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) उपोषण करुन आरक्षणासाठी मोठा लढा उभा करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची आता पुणे जिल्ह्यात सभा (Pune Sabha) होणार आहे. 20 ऑक्टोबरला खेडची सभा झाल्यानंतर त्यांची बारामतीत सभा होणार आहे. तर 21 ऑक्टोबरला इंदापूरमध्ये सभा होणार आहे. बारमतीत तीन हत्ती चौकात तर इंदापूरात तहसिलदार कचेरी शेजारी सभा होणार आहे. 20 ऑक्टोबरला मनोज जरांगे जुन्नरच्या शिवनेरी गडावर (Shivneri Fort) सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांना (Chhatrapati Shivaji Maharaj) अभिवादन करतील आणि त्यानंतर 11 वाजता खेडमध्ये जाहीर सभा घेणार आहेत.

आंदोलनाला मोठा प्रतिसाद

मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्या गावी अंतरावली सराटी या ठिकाणी आमरण उपोषण करुन राज्य शासनाला (State Government) घाम फोडला होता. त्यांच्या या आंदोलनाला संपूर्ण राज्यातून मोठा प्रतिसाद मिळला होता. नुकत्याच अंतरावली सराटी याठिकाणी त्यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या जाहीर सभेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला होता. मनोज जरांगे पाटील हे महाराष्ट्रासह संपूर्ण देशात चर्चेत आले आहेत.

सरकारला 10 दिवसांचा अल्टिमेटम

मराठा आरक्षणाच्या निर्णयासाठी जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी सरकारला दहा दिवसांचा अल्टिमेटम
दिला आहे. आपण 24 ऑक्टोबर नंतर एक मिनिट देखील थांबणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.
अंतरावली सराटी येथील सभेनंतर त्यांच्या पुणे जिल्ह्यात सभा होणार आहेत.
यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा मतदारसंघ असलेल्या बारामती शहरात 20 ऑक्टोबर रोजी
तीन हत्ती चौकात दुपारी चार वाजता सभा होणार आहे. बारामती मधील जाहीर सभेत मनोज जरांगे पाटील काय
बोलणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.

राजगुरुनगरला सर्वात मोठी सभा

बारामतीमधील होणाऱ्या सभेला तब्बल 100 एकर जागा निश्चित केली आहे.
पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठी सभा राजगुरुनगरला होणार असली तरी जरांगे पाटील यांच्या बारामती मधील सभेची
सर्वांना उत्सुकता आहे. बारामती शहरात होणाऱ्या सभेसाठी शेजारी असलेल्या पश्चिम महाराष्ट्रासह इतर भागातून
मराठा समाजाचे बांधव मोठ्या संख्येने येणार आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | चोरट्याचा दुकानातील रोख रक्कमेवर डल्ला !चोरटा दोन तासात गजाआड; खडक पोलिसांकडून सव्वा 5 लाखांची रोकड जप्त

Pune PMC Skysign Department | बेकायदा फ्लेक्सबाजी कडे दुर्लक्ष करणार्‍या आकाशचिन्ह विभागाच्या चार निरीक्षकांची बदली