Manoj Jarange Patil | राणेंचे नाव न घेता जरांगेंचा फडणवीसांवर निशाणा, ”तेव्हा दबावामुळे विरोध केला, आता करणार नाहीत”

Manoj Jarange Patil | maratha andolak manoj jarange patil big decision will suspend hunger strike maratha reservation

महाड : Manoj Jarange Patil | त्यावेळी कोणाच्या तरी दबावामुळे कोकणातील नेत्यांनी कुणबी प्रमाणपत्र (Kunbi Certificate) देण्यास विरोध केला होता, आता ते विरोध करणार नाहीत. छत्रपतींच्या आशिर्वादाने मराठा समाजावरील अन्यायाविरोधात सरू केलेल्या लढ्याला पुन्हा जोमाने सुरू करत आहोत, असा विश्वास मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनाचे नेते मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी व्यक्त केला. दरम्यान, या वक्तव्यातून जरांगे यांनी राणे यांचे नाव न घेता फडणवीसांवर (Devendra Fadnavis) निशाणा साधल्याचे दिसत आहे. ते किल्ले रायगडाच्या पायथ्याशी पत्रकारांशी बोलत होते.

मनोज जरांगे याचा तिसरा राज्यव्यापी दौरा सुरू असून ते काल सातारा येथे होते, आज ते रायगड जिल्ह्यातील महाड येथील किल्ले रायगडावर आले आहेत. येथे पायथ्याला असलेल्या जिजामाता समाधीस्थळाचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी किल्ले रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना (Chhatrapati Shivaji Maharaj) अभिवादन केले. यावेळी जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या लढ्याला सर्वपक्षीय पाठिंब्याची गरज असल्याचे म्हटले.

जेसीबीतून फुले उधळली जात असल्याने टीका होत आहे, याकडे त्यांचे लक्ष वेधले असता जरांगे म्हणाले, अशी टीका करणाऱ्यांवर कोणी फुले उधळत नाही, त्याला आम्ही काय करणार. हे योग्य नाही.

मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय आता सुट्टी देणार नाही.
सर्व समाजाने शांततेच्या मार्गानेच एकजूट दाखवली पाहिजे. एकजुटीशिवाय पर्याय नाही.
वेगवेगळे गट दाखवू नका. मराठ्यांची राज्यात त्सुनामी आली आहे.
आंदोलनाला गालबोट लागेल असे वागू नका, आततायीपणा करू नका, असे आवाहन त्यांनी केले.

जरांगे म्हणाले, शांतता हीच मराठा समाजाची खरी शक्ती आहे. आपल्याला डिवचून
काही तरी विपरित घडविण्याचे कारस्थान आहे. या धोक्यापासून सर्वांनी सावध राहावे. २४ डिसेंबरपर्यंत मुदत दिली आहे.
त्यानंतर आंदोलनाची दिशा काय असेल हे ठरविण्यात येईल. तोपर्यंत संयम आणि शांततेने आंदोलन पुढे न्यायचे आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

भाजपा नेत्याचा भुजबळांना इशारा, ‘जरांगेंबद्दल चुकीचे विधान केल्यास…’

Total
0
Shares
Related Posts