Manoj Jarange Patil | जरांगेंचा आजचा मुक्काम वाशीमध्ये, सरकारला दिला इशारा, जर दगाफटका झाला तर…

मुंबई : मराठा आरक्षणसंबंधीच्या (Maratha Reservation) काही मागण्या राज्य सरकारने (State Govt) मान्य केल्या असून आणखी काही मागण्या मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी केल्या आहेत. आज रात्रीचा मुक्काम मराठा बांधव नवी मुंबईतील वाशीत करणार आहेत. जर सरकारने योग्य निर्णय घेतला नाही तर उद्या दुपारी जरांगे आझाद मैदानाकडे कुच करणार आहेत. या कालावधीत सरकारकडून काही दगाफटका झाला तर गावाकडचे मराठे पण मुंबईत येतील, असा इशारा जरांगेंनी दिला आहे.

जरांगे यांनी म्हटले की, सगेसोयऱ्यांनाही कुणबी प्रमाणपत्र (Kunbi Certificate) देण्याचा अध्यादेश उद्या सकाळी ११ वाजेपर्यंत काढावा. ही मागणी मान्य न झाल्यास मुंबईत येण्याबाबतचा निर्णय उद्या दुपारी १२ वाजता घेतला जाईल. मराठा आंदोलक शांततेत आंदोलन करत आहेत. सरकारने काही दगाफटका केला तर गावाकडे राहिलेले मराठेही झाडून मुंबईत येतील.

मनोज जरांगे म्हणाले, आम्हाला आरक्षण मिळो वा न मिळो आम्ही आझाद मैदानावर जाणार आहोत.
सध्या मराठा समाज शांततेत आंदोलन करत आहे. आता वेळ वाढवून दिली आहे.
त्यामुळे सरकारचा सन्मान करून आणखी वेळ वाढवून दिला आहे. आता सरकारला आरक्षण द्यावेच लागणार आहे.

सरकारला इशारा देताना जरांगे म्हणाले, एकाही मराठा तरुणाला पोलिसांनी धक्का लावला तर साडेपाच कोटी मराठे
घरी दिसणार नाहीत, सर्वांना झाडून मुंबईत बोलावले जाईल.

मनोज जरांगे म्हणाले, सरकारचे मंत्री चर्चेला आले नाहीत. पण सरकारी अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली.
५४ लाख मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत. प्रमाणपत्रे देण्यासाठी सरकारने गावागावात शिबिरे सुरू केली आहेत.
नोंदी मिळालेल्या कुटुंबाला याआधारे प्रमाणपत्रे देण्यात यावे. एका नोंदीवर ५० ते १५० जणांना फायदा होईल.
यामुळे २ कोटी मराठा आरक्षणात जाईल.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

मंदिरात दान करण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकाला लुटले, धायरी येथील प्रकार

Pune Congress News | काँग्रेसने केले आशानगर पाण्याच्या टाकीचे उदघाटन; लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, श्रेय घेण्याचा प्रयत्न भाजपच्या अंगलट – माजी नगरसेवक दत्ता बहिरट

Manoj Jarange Patil | जरांगे यांनी सरकारकडे केल्या ‘या’ मागण्या, तोपर्यंत सर्व शिक्षण मोफत करा, सरकारने रात्रीपर्यंत…

Deepak Kesarkar | जरांगेंच्या आंदोलनावर तोडगा निघाला?, मंत्री केसरकरांनी केले मोठे वक्तव्य