Pune PMC News-Diwali Bonus | महापालिकेकडील कंत्राटी कामगारांना बोनस द्यायची जबाबदारी संबधित ठेकेदारांची; महापालिकेने ठेकेदारांना नोटीस बजावल्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC News-Diwali Bonus | महापालिकेच्या Pune Municipal Corporation (PMC) विविध विभागांमध्ये ठेकेदारामार्फत काम करणार्‍या कंत्राटी कर्मचार्‍यांच्या मागण्यांबाबत ठेकेदारांशी चर्चा करण्यात येईल. कंत्राटी कामगारांच्या विविध प्रश्‍नांसंदर्भात न्यायालयात याचिका दाखल असल्याने महापालिकेला कुठलाही निर्णय घेता येणार नाही. यामुळे कामगारांच्या विविध संघटनांनी महापालिका भवन समोर सुरू केलेले आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहन महापालिका आयुक्त विक्रम कुमार (IAS Vikram Kumar) यांनी आज आंदोलकांच्या शिष्टमंडळाला केले आहे. (Pune PMC News-Diwali Bonus)

महापालिकेच्या आरोग्य, सुरक्षा, अतिक्रमण, व्हेईकल डेपोसह विविध खात्यांमध्ये शेकडो कंत्राटी कर्मचारी काम करतात. दिवाळीनिमित्त बोनस आणि सानुग्रह अनुदान मिळावे यासाठी हे कर्मचारी विविध संघटनांच्या नेतृत्वाखाली मागील काही दिवसांपासून महापालिका भवन समोर आंदोलन करत आहेत. आज या कर्मचार्‍यांच्या व संघटनांच्या प्रतिनिधींनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेउन बोनस, सानुग्रह अनुदानासह विविध मागण्यांचे निवेदन आयुक्तांसोबत चर्चा केली. यावेळी त्यांनी वरील आश्‍वासन दिले. (Pune PMC News-Diwali Bonus)

यासंदर्भातील माहिती देताना अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार (IAS Kunal Khemnar) यांनी सांगितले, की आंदोलन करणारे कर्मचारी हे ठेकेदारांनी नेमले आहेत. त्यामुळे त्यांच्या सर्व मागण्यांची जबाबदारी ही संबधित ठेकेदारांची आहे. या ठेकेदारांसोबत प्रशासनाने बैठक घेउन त्यांना कामगारांच्या मागण्यांबद्दल कळविण्यात आले आहे. संबधित ठेकेदारांना नोटीस बजावण्यात येणार आहे. विशेष असे की पुर्वी निविदांमधील स्पर्धांमुळे ठेकेदारांकडून कर्मचार्‍यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असे. मात्र, मागील वर्षीपासून निविदा देखिल अधिक दराने काढण्यात येत आहेत. दुसरीकडे कंत्राटी कर्मचार्‍यांबाबतची एक याचिका न्यायालयात प्रलंबित असल्याने महापालिका कुठलाही निर्णय घेउ शकत नाही, ही बाब देखिल शिष्टमंडळाच्या निदर्शनास आणून देण्यात आली आहे.

स्वच्छ संस्थेला तीन महिने मुदतवाढ

शहरात घराघरातून ओला व सुका कचरा गोळा करणार्‍या स्वच्छ संस्थेसोबतचा करार ऑक्टोबरमध्ये संपुष्टात आला आहे. या संस्थेने महापालिकेने पुढील पाच वर्षांचा करार करावा तसेच स्वच्छ संस्थेचा पुणे पॅटर्न संपुर्ण राज्यभरात राबवावा अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. यासंदर्भात काल मुंबईत बैठक बोलविण्यात आली होती. ती बैठक काही कारणास्तव होउ शकली नाही. तूर्तास महापालिकेने पुढील निर्णय होईपर्यंत स्वच्छ संस्थेला तीन महिने मुदतवाढ दिली आहे, असेही कुणाल खेमनार यांनी सांगितले.

स्वीपर गाड्या पुरवणार्‍या ठेकेदाराला नोटीस

महापालिकेच्यावतीने शहरातील प्रमुख रस्ते मॅकेनिकल पद्धतीने स्वच्छ करण्यात येते.
रात्रीच्यावेळी होणारे स्वच्छतेचे हे काम दोन ठेकेदारांना देण्यात आले असून त्यांची बारा वाहने आहेत.
मॅकेनिकल पद्धतीने हे रस्ते झाडण्यात येत असले तरी त्या रस्त्यांवर मोठ्याप्रमाणावर धूळ उडते
तसेच कचराही तसाच असतो, अशा तक्रारी आहेत.
घन कचरा विभागाने याची पाहाणी केल्यावर काही गाड्यांचे रस्ते झाडणारे ब्रश खराब झाल्याचे
तसेच पाण्याचे फवारे उडवणारे जेटही काम करत नसल्याचे निदर्शनास आले आहे.
या गाड्यांचा तपासणी अहवाल तयार केला असून या गाड्या एकाच ठेकेदाराच्या आहेत.
त्याला दंड तर ठोठावलाच आहे, त्याचवेळी त्यांचे काम बंद करू नये, अशी नोटीसही पाठविली असल्याची माहिती कुणाल खेमनार यांनी दिली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune PMC Anti Encroachment Drive | शिवाजीनगर परिसरातील हॉटेल्सवर कारवाईचा पुन्हा दणका,
पुणे महापालिकेची 13 हॉटेल्सवर कारवाई