Manoj Jarange Patil On chhagan-bhujbal | मनोज जरांगे पाटलांचा छगन भुजबळांना इशारा, म्हणाले – ‘तुम्ही मराठ्यांना डिवचल्यावर…’

नांदेड : Manoj Jarange Patil On chhagan-bhujbal | राज्यातील ओबीसी नेते (Maharashtra OBC Leader) आता मराठा आरक्षणाला (Maratha Reservation) विरोध करत आहेत, त्यांना मराठा समाजाने आतापर्यंत खूप काही दिले. कधीतरी कामी याल म्हणून मराठ्यांनी छगन भुजबळांना मदत केली. आता आमच्यावर आरक्षण घ्यायची वेळ आली तर आम्हाला म्हणतात, ५० टक्क्यांच्या आत आरक्षण घेऊ देणार नाही. पण आम्ही ५० टक्क्यांच्या आतच आरक्षण घेऊ, असे आव्हान मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांना दिले आहे. (Manoj Jarange Patil On chhagan-bhujbal)

मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक मनोज जरांगे पाटील सध्या जनजागृती करण्यासाठी मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहेत. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या वक्तव्यावरून दोघांमध्ये सध्या टीका-टिप्पणी सुरू आहे. रविवारी नांदेड येथील सभेत बोलताना जरांगे यांनी भुजबळांना आव्हान दिले आहे. (Manoj Jarange Patil On chhagan-bhujbal)

मनोज जरांगे म्हणाले, मी स्वतःहून भुजबळांवर टीका केली नाही. ते बोलले म्हणून मी बोललो. ते बोलले मराठ्यांना आरक्षण देऊ नका, म्हणून मी बोललो. मी कोणावरच आधी टीका करत नाही. मराठ्यांना आरक्षणच द्यायचे नाही, इकडे घुसायचेच नाही, असे ते बोलले मग मी उत्तर दिले. भुजबळ बोलण्याआधी मी काही बोललो का?

माझे उपोषण सुटल्यापासून मी कधीच कोणावर ती व्यक्ती बोलण्याआधी बोललो नाही.
आधी भुजबळ बोलले मग मी त्यावर माझे मत मांडले. आम्ही काय गप्प बसणार का? आम्हाला डिवचल्यावर आम्ही गप्प बसणार नाही. तुम्ही गप्प बसणार का? तुम्हीसुद्धा गप्प बसणार नाही. तुम्ही मराठ्यांना का डिवचता? तुम्ही डिवचलं म्हणून आम्ही टीका केली. ते मराठा आरक्षणाविरोधात बोलले की सामान्य मराठा तुटून पडणार.

काय म्हणाले होते भुजबळ
माझा मराठा आरक्षणाला विरोध नाही. केवळ मराठ्यांना वेगळे आरक्षण द्या, असे माझे मत आहे.
हे माझे एकट्याचे मत नाही. सगळेच जण याच मताचे आहेत. मी काही एकटा अशा मताचा नाही.
परंतु, मला एकट्यालाच टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तुम्ही हे सगळ्यांच्या बाबतीत बोला.
नाहीतर त्याला राजकारणाचा वास येईल हे लक्षात ठेवा, असे भुजबळ म्हणाले होते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nanded Government Hospital | धक्कादायक! नांदेडमध्ये वेळेत औषधे न मिळाल्याने 24 तासांत 24 रुग्ण दगावले

Rohit Patil On Water Issue | पाणी प्रश्नाबाबत रोहित पाटील म्हणाले – ‘आबांचा जो इतिहास…’