Nanded Government Hospital | धक्कादायक! नांदेडमध्ये वेळेत औषधे न मिळाल्याने 24 तासांत 24 रुग्ण दगावले

नांदेड : Nanded Government Hospital | राज्यातील आरोग्य सेवा किती बिघडली आहे, याचा धक्कादायक प्रकार नांदेडमध्ये समोर आला आहे. येथे अत्यवस्थ रूग्णांना वेळेवर औषधे न मिळाल्यामुळे २४ तासात २४ जणांना जीव गमवावा लागला आहे. संतापजनक बाब म्हणजे या मृतांमध्ये १२ नवजात बालकांचा समावेश आहे. ही गंभीर घटना नांदेडच्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात घडली आहे. (Nanded Government Hospital)

राज्यभरात औषधांचा तुटवडा
राज्यातील आरोग्य यंत्रणा सध्या कोलमडली असल्याचे दिसून येत आहे. हाफकिनने औषधे खरेदी करून न दिल्याने शासकीय रुग्णालयांना औषधांचा पुरवठा बंद आहे. राज्यभरातील गोरगरिब रुग्णांचे यामुळे हाल होत आहेत. रुग्णालयांमध्ये प्रचंड तुटवडा जाणवत आहे. (Nanded Government Hospital)

नांदेडच्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दररोज शेकडो रुग्ण येतात. औषधांच्या तुटवडा असल्याने रुग्णांना बाहेरून औषधे आणण्याचा सल्ला येथील डॉक्टर देत आहेत. वेळेत औषधे उपलब्ध न झाल्याने येथे २४ तासांत २४ जणांचा मृत्यू झाला आहे. ६ पुरुष आणि ६ स्त्रीजातीच्या नवजात बालकांचा मृतांमध्ये समावेश आहे. या धक्कादायक प्रकारामुळे राज्यातील आरोग्य यंत्रणेची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत.

या गंभीर घटनेनंतर आरोग्य यंत्रणेने येथे रेफर रूग्ण जास्त येतात, असे म्हणत हात झटकण्याचा प्रयत्न केला आहे. येथील अधिष्ठाता डॉ. एस. आर. वाकोडे यांनी म्हटले की, येथे शेजारील चार ते पाच जिल्ह्यांतून रुग्ण येतात. अनेकजण खासगी रुग्णालयात उपचार घेतात. पैसे संपल्यानंतर शेवटच्या क्षणी ते शासकीय रुग्णालयात येतात. आलेल्या प्रत्येक रुग्णाला आम्ही दाखल करून घेतो. त्यामुळे मृत्यूचा आकडा मोठा दिसतो. औषधांचा तुटवडा आहे; परंतु औषधे नसल्याने रुग्णाचा जीव गेला असे म्हणता येणार नाही. लवकरच डीपीडीसीच्या निधीतून औषधे खरेदी करण्यात येणार आहे.

दरम्यान, जिल्हा नियोजन समितीने नांदेडच्या या रुग्णालयासाठी ४ कोटींचा निधी मंजूर केला आहे. यातील १ कोटी
रुपयात यंत्रसामग्री, १ कोटीची औषधे खरेदी, १ कोटी शस्त्रक्रियेसाठी लागणारे साहित्य आणि उर्वरित १ कोटी ऑक्सिजन
फ्लँटसाठी ठेवण्यात आले आहेत; परंतु चार कोटींच्या प्रस्तावाला अद्याप तांत्रिक मान्यता मिळाली नाही.
त्यामुळे १ कोटींची औषध खरेदी रखडली आहे.

रुग्णालयात अत्यावश्यक औषधे नसल्यामुळे शेजारील जिल्ह्याच्या रुग्णालयात एक्स्पायरी डेट संपत असलेल्या
औषधांचा साठा गरज पडल्यास मागवला जात आहे. नेत्यांच्या वाढदिवशी औषधे भेट देण्याचे आवाहन केले जात आहे.
रुग्णालय प्रशासनाने खरेदी केलेल्या ४० लाखांच्या औषधांचा साठा संपत आला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

INDIA Alliance Main Bhi Gandhi Rally In Mumbai | ‘इंडिया’च्या ‘मी पण गांधी’ पदयात्रेला गालबोट, मुंबईत कार्यकर्ते-पोलिसांत वादंग?