
Rohit Patil On Water Issue | पाणी प्रश्नाबाबत रोहित पाटील म्हणाले – ‘आबांचा जो इतिहास…’
सांगली : Rohit Patil On Water Issue | राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आर. आर. पाटील (Late R.R. Patil) यांच्या पत्नी सुमन पाटील (Suman Patil) आणि मुलगा रोहित पाटील हे टेंभू सिंचन योजनेसंदर्भातील मागणीसाठी आज उपोषणाला बसणार होते. परंतु, तत्पूर्वीच राज्य सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत. टेंभू सिंचन योजनेत तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील १७ गावांचा समावेश करावा, अशी त्यांची मागणी होती. या प्रकरणावर आता रोहित पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Rohit Patil On Water Issue)
रोहित पाटील यांनी म्हटले की, माझ्याकडे सर्व पुरावे आहेत. योजनेसाठी ताईंनी काय प्रयत्न केले असा प्रश्न असेल तर त्यांनी व्यासपीठावर येऊन पुरावे घेऊन जावेत. ही मागणी करत असताना व्यासपीठावर मी काय बोलणार याची सर्वांना प्रतिक्षा आहे. (Rohit Patil On Water Issue)
ते पुढे म्हणाले की, पाण्यामध्ये राजकारण न करण्याचे आणि कोणावरही आरोप न करण्याचे आम्ही ठरवले आहे. पण ज्या दिवशी सुप्रिमो मंजूर होईल, त्या दिवशी निश्चितपणे असा इतिहास घडवू, जो इतिहास तुम्ही आबांचा काढणार होता, तो इतिहास आम्ही तुमचा काढल्याशिवाय राहणार नाही.
टेंभू सिंचन योजनेत तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील १७ गावांचा समावेश करावा, आणि इतर
मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या आमदार सुमन पाटील यांनी आज सांगली जिल्हाधिकारी
कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा दिला होता.
तत्पूर्वीच महाराष्ट्र शासनाने टेंभू विस्तारीत योजनेसाठी ८ टीएमसी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी अंतिम मंजुरी दिली.
परंतु, टेंभू योजना अहवालाला तृतीय सुधारीत मान्यता मिळेपर्यंत लढा सुरूच ठेवू, असे सुमन पाटील यांनी म्हटले आहे.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update