Manoj Jarange Patil On Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीसांना जरांगेंचे खुले आव्हान, ”तर तुमच्या ४८ पैकी एकही खासदार…”

बीड : Manoj Jarange Patil On Devendra Fadnavis | मी वडवणीतून तुम्हाला आव्हान देतो, तुम्ही मला बदनाम करा, कट रचा. पण मराठा समाजापासून तोडण्याचा प्रयत्न केलात तर तुमच्या ४८ पैकी एकही खासदार निवडून येऊ देणार नाही. माझ्याविरोधातले व्हिडीओ व्हायरल केले तर याचा सुपडा साफ करायचा, असे आव्हान जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. ते बीडमध्ये (Beed Sabha) आयोजित सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी फडणवीस यांचा एकेरी उल्लेख करत जोरदार टीका केली.

मनोज जरांगे म्हणाले, देवेंद्र फडणवीसांना जाहीर सांगतो आहे, तुम्हाला जे करायचे आहे ते तुम्ही कार्यकत्र्यांच्या माध्यमांतून करणार आहात. पण मला जे करायचे ते पण मी करणार आहे. कुठलेही व्हिडीओ आणा, कसलेही रेकॉर्डिंग आणा मी आरक्षण घेणार म्हणजे घेणारच. वेळ पडली तर समाजासाठी वेगळे आंदोलन (Maratha Andolan) करेन.

मनोज जरांगे म्हणाले, मला कितीही बदनाम करा, समाजापासून एक इंचही मागे हटणार नाही. या भूमिकेवर मी ठाम आहे. मेलो तरीही तुमच्या बाजूने येणार नाही. फडणवीस यांची वृत्ती नीच आहे. आपल्या विरोधात इमानदार पोरगा लढत आहे याचे तुम्ही कौतुक करायला पाहिजे होते, तर तुम्ही खरे राजकारणी. फडणवीस हे बेगडी राजकारणी आहेत, अशी टीका जरांगे यांनी केले.(Manoj Jarange Patil On Devendra Fadnavis)

जरांगे म्हणाले, प्रकाश आंबेडकर पत्रकार परिषदेत म्हणाले की, मला गुप्त माहिती मिळाली आहे की देवेंद्र फडणवीसांनी
डाव रचला आहे. मुंबईला जसा मोर्चा काढला होता त्यावेळी तेरा ट्रॅप रचले होते. आता या आठवड्यात असेच सुरु आहे.
बदनाम करण्यासाठी विरोधात बोलायला लावायचे, केसेस करायच्या, सामान्य मराठा पोरांवर केसेस करायच्या हे चालले आहे.

फडणवीस यांच्यावर गंभीर टीका करताना जरांगे म्हणाले, देवेंद्र फडवणीस यांच्यासारखा आणि खुनशी मंत्री पाहिला नाही.
त्यांच्याकडून बोलणारे सात ते आठ आहेत. सत्ता येत असते जात असते, नका त्रास देऊ. माझी एसआयटी चौकशी सुरू आहे.
जामनेरचे टमरेल गिरीश महाजन म्हणतो माझे खूप लाड केले अरे तूच आमचा चहा प्यायला आणि पोहे खाल्ले,
अशी टीका जरांगे यांनी केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Sahakar Nagar Crime | महागड्या सायकल चोरणाऱ्या आरोपीला सहकारनगर पोलिसांकडून अटक, 6 सायकल जप्त

Punit Balan Group (PBG) | इंद्राणी बालन फाऊंडेशन, पुनित बालन ग्रूपचे कार्य वाखाणण्याजोगे : सुहास पाटील

Pimpri Chinchwad Crime | पिंपरी : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सांगत दोघांची एक कोटींची फसवणूक