Manoj Jarange Patil On Maharashtra Govt | ‘सरकारने शिष्टमंडळ पाठवून फसवणूक केली, महाराष्ट्रभर गुन्हे दाखल करू’ – मनोज जरांगे

Manoj Jarange Patil | Manoj Jarang's warning to the grand alliance government, don't take me lightly, if I enter politics, your...

छत्रपती संभाजीनगर : Manoj Jarange Patil On Maharashtra Govt | सरकारने शिष्टमंडळ पाठवून आमची फसवणूक केली आहे. आज देऊ, उद्या देऊ, अशी आश्वासने आम्हाला देण्यात आली होती. यामध्ये राज्याचे मंत्री, अधिकारी आणि मुख्यमंत्र्यांचे ओएसडी आहेत. या सर्वांवर आम्ही महाराष्ट्रभर गुन्हे दाखल करू, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी दिला आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केल्यानंतर सरकारने मनोज जरांगे आणि मराठा आंदोलकांवर कारवाईचा फास आवळण्यास सुरूवात केली आहे. मागील काही दिवसात जरांगे यांच्यासह शेकडो कार्यकत्र्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच काल अंतरवाली सराटी येथील मराठा आंदोलनाचे व्यासपीठ आणि मंडप उखडून टाकण्याचे आदेश सरकारने दिले. यामुळे मनोज जरांगे आक्रमक झाले आहेत.

जरांगे यांनी म्हटले की, आम्हाला जर ते कायदेशीर कचाट्यात घेणार असतील तर आम्हीही त्यांना कायदेशीर
अडचणीत आणू.

सरकारवर संताप व्यक्त करताना मनोज जरांगे म्हणाले, सगेसोयरेची अंमलबजावणी करा, मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण
द्या या मागणीवर आपण ठाम आहोत. त्यासाठी, सध्या केवळ परीक्षा असल्याने ३ मार्चपर्यंतचे रास्तारोको आंदोलन रद्द
केले आहे. गावागावात साखळी उपोषण सुरू आहे. यावेळी, जरांगेंनी मराठा नेत्यांनाही सुनावले.

मनोज जरांगे म्हणाले, सरकारकडून दडपशाही सुरू आहे. गृहमंत्र्यांनी आंतरवालीतील मंडप काढून फेका, व्यासपीठ काढा,
असे आदेश दिले आहेत. पण, आंतरवालीचा मंडप हा मराठ्यांच्या अस्मितेचा मंडप आहे, तो आंतरवालीचा मंडप नाही.
त्यामुळे, मराठ्यांनी घाबरण्याचे कारण नाही. त्याच मंडपाने मराठा समाज एक केलेला आहे, त्याच मंडपाने मराठा
समाजाला आरक्षण मिळवून दिलेले आहे.

जरांगे म्हणाले, सरकारला, विशेष करुन गृहमंत्र्यांना सांगणे आहे की, असले चाळे बंद करा. मंडपाजवळ खून पडले नाहीत,
कापाकापी सुरू नाही की तिथे दहशतवाद्यांची लेकरे नाहीत. तिथे शांततेत साखळी उपोषण सुरू आहे, तुम्ही दडपशाही
बंद करा.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

PM Modi Yavatmal Visit | PM मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर, ‘या’ जिल्ह्यात महिला मेळाव्यासह विविध कार्यक्रम, PM Kisan च्या १६ व्या हप्त्याचे वितरण करणार

Amit Shah On Uddhav Thackeray | अमित शाह यांची इंडिया आघाडीवर जोरदार टीका, उद्धव ठाकरेंना त्यांचा मुलगा मुख्यमंत्री व्हावा असे वाटते…

Sanjay Raut On Amit Shah | अमित शहांच्या घराणेशाहीच्या टीकेला राऊतांचे प्रत्युत्तर, ”जय शाहने विराट कोहलीपेक्षा जास्त सिक्सर्स मारलेत का?”

Total
0
Shares
Related Posts