Manoj Jarange Patil On Maratha Reservation | मनोज जरांगेंचा सरकारला पुन्हा इशारा ! 40 दिवसांचा वेळ दिलाय, आरक्षण घेतल्याशिवाय…

जालना : Manoj Jarange Patil On Maratha Reservation | सरकारने टिकणारे आरक्षण देण्यासाठी चाळीस दिवसांचा वेळ मागितला, तो आम्ही दिला. सरसकट मराठा समाजाला आरक्षण देतो असे सांगितले आहे. टिकणारे आरक्षण देऊ असे आश्वासन गिरीश महाजन यांनी दिले होते. आता टिकणारे आरक्षण द्या. आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय शांत बसणार नाही, असा इशारा, मराठा आंदोनाचे नेते मनोज जरांगे यांनी दिला आहे. ते पत्रकारांशी बोलत होते. (Manoj Jarange Patil On Maratha Reservation)

मनोज जरांगे यांनी अमरण उपोषण सोडले असले तरी जालना येथील आंतरवली सराटी गावात त्यांचे आंदोलन सुरुच आहे. मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळेपर्यंत मी घराचा उंबरठा ओलांडणार नाही, असे त्यांनी म्हटले. आज पुन्हा एकदा त्यांनी सरकारकडे, टिकणारे आरक्षण देण्याची मागणी केली. (Manoj Jarange Patil On Maratha Reservation)

पुढील आंदोलनाच्या तयारीची माहिती देताना जरांगे म्हणाले, मराठा बांधवांशी संवाद साधण्यासाठी ३० सप्टेंबरपासून महाराष्ट्र दौरा करणार आहोत. आंतरवली सराटी गावातून हा दौरा सुरु होईल. ११ ऑक्टोबरपर्यंत दौरा चालेल. यात पुढील आंदोलनाची दिशा आम्ही ठरवू. कायदा सुव्यवस्था बिघडेल असे कुठलेही आंदोलन होणार नाही.

जरांगे म्हणाले, सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावे म्हणून आम्ही जमणार आहोत. मराठा समाजाच्या काय भावना आहेत? सरकारने काय केले? ते आम्ही सांगणार आहोत. सरकारने लवकरात लवकर आरक्षण दिले पाहिजे. हीच आमची मागणी आहे.

महसूल प्रशासनाने जवळपास ६५ लाख अभिलेखांची तपासणी केल्यानंतर केवळ ५ हजार कागदपत्रांमध्ये कुणबी
नोंदी आढळल्या आहेत. त्यामुळे मराठा आरक्षणाबाबत सरकार काय निर्णय घेणार याबाबत चर्चा सुरू आहे.
यावर मनोज जरांगे म्हणाले, ही कागदपत्रे सरकारला केवळ पुरावा म्हणून आवश्यक आहेत. ५ हजार कुणबी नोंदी पुराव्यासाठी खूप आहेत.

ते म्हणाले, मी पूर्वीपासून सांगत आहे की, मराठ्यांना कुणबी दाखले देण्यासाठी कसल्याही पुराव्याची गरज नाही.
२००४ सालच्या जीआरनुसार, मराठा आणि कुणब्यांना सरसकट प्रमाणपत्र देता येते.

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी २९ ऑगस्टपासून बेमुदत उपोषण आंदोलन सुरु
केले होते. या आंदोलनादरम्यान पोलिसांनी अमानुष लाठीमार केल्याने त्यांचे तीव्र पडसाद देशभर उमटले होते.
अनेक चर्चा आणि वाटाघाटी झाल्यानंतर जरांगे यांनी उपोषण मागे घेतले होते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mohit Kambojs Criticized Ajit Pawar | फडणवीसांचे जवळचे सहकारी कंभोज यांनी थेट अजित पवारांना डिवचले, मात्र काही वेळातच डिलीट केले ट्विट