Mohit Kambojs Criticized Ajit Pawar | फडणवीसांचे जवळचे सहकारी कंभोज यांनी थेट अजित पवारांना डिवचले, मात्र काही वेळातच डिलीट केले ट्विट

मुंबई : Mohit Kambojs Criticized Ajit Pawar | भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू सहकारी मोहित कंभोज यांनी महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर थेट टीका केल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. राज्यातील राजकारणात याबाबत जोरदार चर्चा सुरू झाली आहे. कंभोज यांनी ट्विटद्वारे ही टीका केली होती. मात्र काही वेळातच हे ट्विट डिलिट केले. (Mohit Kambojs Criticized Ajit Pawar)

लवकरच अजित पवार मुख्यमंत्री होणार अशा प्रकारची वक्तव्य सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार समर्थक नेते आणि पदाधिकारी करत आहेत. कालपरवा अजित पवार यांनीही अर्थखातं जास्त काळ आपल्याकडे राहणार नाही, अशा प्रकारचे वक्तव्य केल्याने चर्चेला उधाण आले होते. (Mohit Kambojs Criticized Ajit Pawar)

त्यातच, आज राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील लालबागच्या राजाजवळ अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत या मागणीची एक चिठ्ठी ठेवली. या चिठ्ठीमध्ये, हे लालबागच्या राजा, आमचे अजितदादा पवार लवकरात लवकर या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होऊ दे, असे लिहिले होते. यावरुन आता भाजप नेते मोहित कंबोज यांनी ट्विट केले आणि काही वेळातच ते डिलिट केले.

या ट्विटमध्ये भाजपा नेते मोहित कंभोज यांनी लिहिले होते की, मुख्यमंत्री होण्यासाठी ४५ नव्हे तर १४५ आमदार लागतात.
हे ट्विट एक प्रकारे अजित पवार यांना त्यांच्या ताकदीची जाणीव करून देत आरसा दाखवणारे असल्याने त्याची जोरदार
चर्चा सुरू झाली आहे.

काही दिवसापूर्वी भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनीही अजित पवार यांच्यावर टीका केली होती.
यानंतर भाजप नेते कंबोज यांनी अजित पवार यांना लक्ष्य केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

दरम्यान, आज सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईतील लालबागच्या राजाचे दर्शन घेतले.
यावेळी त्यांच्यासोबत पार्थ पवार (Parth Pawar), प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) होते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Vidhan Sabha Speaker Rahul Narvekar | अपात्रते संदर्भात सुनावणी सुरू असताना राहुल नार्वेकर परदेश दौऱ्यावर