Manoj Jarange Patil On Maratha Reservation | जरांगेंचे आमरण उपोषण पुन्हा सुरू, म्हणाले – ‘सरकार जाणूनबुजून मराठा समाजाची दिशाभूल करतंय’

जालना : Manoj Jarange Patil On Maratha Reservation | चाळीस दिवसांची मुदत देऊनही सरकारने मराठा आरक्षण (Maratha Reservation) दिले नाही. मराठा समाजाच्या आंदोलकांवरील गुन्हे दोन दिवसांत मागे घेऊ असे मुख्यमंत्र्यांनी (CM Eknath Shinde) सांगितले होते. मात्र चाळीस दिवस होऊनही ते मागे घेतलेले नाहीत. म्हणजेच सरकार जाणून बुजून मराठा समाजाची दिशाभूल करत आहे, असा याचा अर्थ आहे, असा संताप मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे (Manoj Jarange Patil On Maratha Reservation) यांनी व्यक्त केला आहे.

मनोज जरांगे म्हणाले, आजपासून पुन्हा आमरण उपोषण सुरू करत आहोत. २९ ऑगस्टला आमरण उपोषण सुरू झाले. यानंतर, १४ तारखेला टिकणारे आरक्षण देण्यासाठी एक महिन्याची वेळ द्या असे मुख्यमंत्री म्हणाले होते. त्यांनी शब्द दिला होता आणि आपण उपोषण सोडले होते. आज ४१ दिवस झाले, मात्र सरकारने यावर कोणतेही पाऊल न उचलल्याने स्थगित केलेले आमरण आणि साखळी उपोषण पुन्हा सुरू करत आहोत.

मनोज जरांगे (Manoj Jarange Patil On Maratha Reservation) म्हणाले, आता आमरण उपोषणात पाणी
आणि कुठल्याही प्रकारचे वैद्यकीय उपचार घेणार नाही. या गोर गरीब लेकरांसाठी पुन्हा ताकदीने कठोर
आमरण उपोषण सुरू केले आहे. सरकारचा आणि मुख्यमंत्र्यांचा मान सन्मान ठेऊन ४० दिवसांचा वेळ दिला होता.
मात्र, गोर गरिबांच्या वेदना लक्षात घेऊन आरक्षण देण्यात आलेले नाही.

जरांगे पुढे म्हणाले, आम्हाला कालपर्यंत आशा होती, की सरकार हक्काचं ५० टक्क्यांच्या आतमधील ओबीसी आरक्षण (OBC Reservation) देईल आणि मराठा समाजाचा ओबीसीत समावेश होईल. मात्र तसे झाले नाही. म्हणून उपोषण पुन्हा सुरू केले आहे.

मराठा तरुणांच्या आत्महत्यांबाबत बोलताना मनोज जरांगे म्हणाले, मराठा समाजाच्या आरक्षणासाठी १६-१७ हून
अधिक बांधवांनी आत्महत्या केल्या, मात्र संभाजीनगर वगळता, इतरांसाठी मद देण्यासंदर्भात सरकारने पाऊल
उचललेले नाही. आमचा बांधव आमच्यातून गेला याला सरकार जबाबदार आहे. सरकारने आरक्षण दिले असते तर
आमचा भाऊ आमच्यातून गेला नसता, असा आरो जरांगे यांनी केला.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | रिकाम्या टाकीत गॅस भरताना स्फोट, एकजण जखमी; कोथरुडमधील घटना, दोघांवर FIR

Pune Crime News | घरमालकाला गुंगीचे औषध देऊन नोकरांचा पैशावर डल्ला, औंध परिसरातील घटना

Maratha Reservation | मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक, जरांगे पाटलांनी थोडा वेळ द्यावा, भाजप नेत्याचे आवाहन

Shivsena (UBT) Dasara Melava | ‘गद्दारांनी दिल्लीची चाकरी करावी, महाराष्ट्रात पुन्हा…’, ठाकरे गटाचा शिंदे गटावर हल्लाबोल

MLA Sunil Kamble | आरोग्यदूत आमदार सुनिलभाऊ कांबळे

Nashik News | गरबा खेळताना भोवळ आल्याने तरूणाचा मृत्यू, नाशिकमधील दुर्दैवी घटना