Pune Crime News | घरमालकाला गुंगीचे औषध देऊन नोकरांचा पैशावर डल्ला, औंध परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | घरमालकाला गुंगीचे औषध देऊन घरातील कपाटात ठेवलेली रोकड नोकरांनी चोरुन नेली. हा प्रकार सोमवारी (दि.23) रात्री साडेसात ते मंगळवार (दि.24) सकाळी साडेदहा च्या सुमारास औंध डीपी रोडवरील कॉकपीट अनंत को. हौ. सोसायटी मध्ये घडला आहे. याप्रकरणी घरकार काम करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

याबबत प्रतिष्ठा महागावकर (वय-45 रा. थेरगाव) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार त्यांच्या वडिलांच्या घरात घरकाम करणारे प्रेमनाथ (वय-45) व पुष्पा (वय-42 पूर्ण नाव पत्ता माहित नाही) यांच्यावर आयपीसी 381, 328, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे वडील औंध डिपी रोडवर असलेल्या सोसायटीत त्यांच्या मावस भावासोबत राहतात. त्यांच्या घरामध्ये आरोपी हे घरगडी म्हणून काम करतात. आरोपींनी चोरी करण्याच्या उद्देशाने फिर्यादी यांचे वडिल व मावस भाऊ यांना गुंगीकारक औषध दिले. त्यामुळे दोघांना गुंगी आली. त्यानंतर आरोपींनी घरातील कपाटात ठेवलेले 40 हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. हा प्रकार मंगळवारी सकाळी उघडकीस आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक झरेकर (API Zarekar) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maratha Reservation | मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक, जरांगे पाटलांनी थोडा वेळ द्यावा, भाजप नेत्याचे आवाहन

Shivsena (UBT) Dasara Melava | ‘गद्दारांनी दिल्लीची चाकरी करावी, महाराष्ट्रात पुन्हा…’, ठाकरे गटाचा शिंदे गटावर हल्लाबोल

Pune Crime News | धक्कादायक! पिझ्झा उशिरा दिल्याने डिलिव्हरी बॉयवर फायरिंग, वाघोली परिसरातील घटना

Pune News | पुण्यात ‘ऑक्टोबर हिट’चा चटका होतोय कमी, थंडीची चाहुल!

MLA Sunil Kamble | आरोग्यदूत आमदार सुनिलभाऊ कांबळे

Nashik News | गरबा खेळताना भोवळ आल्याने तरूणाचा मृत्यू, नाशिकमधील दुर्दैवी घटना