Maratha Reservation | मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक, जरांगे पाटलांनी थोडा वेळ द्यावा, भाजप नेत्याचे आवाहन

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा सध्या चर्चेत आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी राज्य सरकारला (State Government) दिलेल्या अल्टिमेटमचा आज अखेरचा दिवस होता. मराठा आरक्षण मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही असे म्हणत सरकारला आता एक तासाचा वेळ वाढवून देणार नसल्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. तसेच, आरक्षणाची (Maratha Reservation) घोषणा न झाल्यास पुन्हा उपोषण करण्याची भूमिका जरांगे पाटील यांनी घेतली आहे. यावर राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सरकार मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक आहे. आरक्षण देईल तर हेच सरकार देईल. फक्त त्यासाठी थोडा वेळ लागेल, असे गिरीश महाजन यांनी सांगितले. ते नाशिकमध्ये माध्यमांशी बोलत होते. यावेळी, मनोज जरांगे यांनी चाळीस दिवसांची मुदत दिली होती. आम्ही न्यायमूर्ती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली. समितीचे वेगाने काम सुरु असल्याचे महाजन यांनी सांगितले.

मनोज जरांगे पाटील यांनी आम्हाला थोडा वेळ द्यावा. कायदेशीर आणि टकणारं आरक्षण देण्यासाठी कायदेशीर
आधार द्यावा लागेल. त्यासाठी अजूनही थोडा वेळ लागेल. चर्चा सुद्धा सुरु राहिली पाहिजे, चर्चेतून मार्ग निघेल.
पुन्हा उपोषणाला बसून, शरीराला ताण देऊन फार काही उपयुक्तता होणार नाही, असेही गिरीश महाजन यांनी म्हटले.

याशिवाय, सरकसकट आरक्षणाची काही आवश्यकता नाही. पण मराठवाड्यात त्याची आवश्यकता आहे.
त्यासाठी समिती अभ्यास करत आहे. अजून किती दिवस लागेल, हे मला सांगता येणार नाही.
आमच्या सरकारवर लोकांचा विश्वास आहे. त्याचमुळे आमच्या सरकारच्या काळात मोर्चे निघत आहेत.
सरकार त्याची दखल घेत आहे. परंतु, याबाबतीत तोडगा काढायला थोडा वेळ लागेल, असेही गिरीश महाजन यांनी सांगितले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sharad Pawar On Yuva Sangharsh Yatra | ‘युवा संघर्ष यात्रेकडे दुर्लक्ष केल्यास सत्ता गमवावी लागेल’, शरद पवारांचा सरकारला थेट इशारा

Senior Police Inspector Lost His Pistol | बंदोबस्तादरम्यान वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची शासकीय पिस्तूल गायब

Pune Crime News | कंपनीचा रिसर्च डाटा व पेटंट डाटा चोरून सुरु केली कंपनी, महाळुंगे येथील प्रकार; फसवणूक करणाऱ्या दोघांवर FIR