Manoj Jarange Patil On Raj Thackeray | मनोज जरांगे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरेंना केला प्रतिप्रश्न – ”माझ्या आंदोलनामागे कोण हे…”

मुंबई : Manoj Jarange Patil On Raj Thackeray | माझ्या आंदोलनामागे कोण आहे? हे राज ठाकरेंनीच शोधून काढावं आणि मलादेखील सांगावं. या आंदोलनामागे कोणाचाही हात नसून ही मराठा समाजाची साथ आहे. त्यासोबतच मराठ्याची लेकरं मोठे व्हायला लागले, त्यांचं कल्याण व्हायला लागलं की, अशी वक्तव्य करायला सुरुवात होते, असे वक्तव्य मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी करून मनसे प्रमुख राज ठाकरे (Manoj Jarange Patil On Raj Thackeray) यांना प्रत्युत्तर दिले आहे.

जरांगे आज पुणे जिल्ह्यातील दौंड येथे आहेत. राज ठाकरे यांनी जरांगेंच्या आंदोलनावर शंका उपस्थित केल्याने जरांगे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

जरांगे पुढे म्हणाले, आमच्यावर खोटे आरोपदेखील केले जातात. मात्र, मराठा समाज आता कोणाचेही ऐकणार नाही. मराठा समाजाला स्पष्ट माहिती झाले आहे की, मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे आणि सगळे मराठा मिळून आम्ही आरक्षण मिळवणारच आहोत.

सरकारला इशारा देताना मनोज जरांगे म्हणाले, २४ डिसेंबरनंतर एकही दिवस सरकारला मिळणार नाही. आता आम्हाला आरक्षण मिळेल याची खात्री आहे. अन्यथा २४ डिसेंबरनंतर पुढचे आंदोलन मुंबईत असणार आहे. (Manoj Jarange Patil On Raj Thackeray)

काय म्हणाले मनसे प्रमुख राज ठाकरे…
राज ठाकरेंनी म्हटले की, मी जेव्हा मनोज जरांगे पाटील यांना भेटलो होतो, तेव्हा अशाप्रकारे आरक्षण मिळणार नाही असे मी बोललो होतो. परंतु आता जरांगे पाटील आहेत की त्यांच्यामागे कोण आहे? त्यातून महाराष्ट्रात जातीय तेढ निर्माण करायचे असे आहे का? कारण निवडणुकीच्या तोंडावर या सगळ्या गोष्टी होत आहेत.

हे इतके सरळ चित्र दिसत नाही. त्यामुळे कालांतराने यामागे कोण आहे हे कळेलच. अशा अनेक गोष्टी पुढे येतात,
ज्यामुळे लोक ज्याने त्रस्त आहेत हे त्यांच्या डोक्यात येताच कामा नये. लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठीही मुद्दे काढले जातात.

महाराष्ट्रात सध्या इतकी राजकीय संभ्रमावस्था आहे, जी आजपर्यंत मी कधीही पाहिली नाही.
याचे एकमेव कारण म्हणजे लोक हसण्यावर घेत आहेत. मूळात या सर्व गोष्टी मतदारांची प्रतारणा, अपमान आहे.
या अपमानाचा राग जोवर येत नाही, उघडपणे मतदारांचा विचार करत नाहीत,
मतदारांना मुर्ख समजतात, त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत मतदार काय भूमिका घेतात हे पाहायचे आहे.

निवडणुकीत भलत्याच गोष्टींवर मतदान करणार असाल तर मतदारांची किंमत काय राहणार? राजकीय पक्षांना,
नेत्यांना मतदारांची भीती वाटली पाहिजे. कायद्याला कोणी विचारत नाही, मतदाराला कुणी विचारत नाही.
तुम्ही केवळ मतदान करा, त्यामुळे निर्ढावलेले आहेत. नुसते सुशिक्षित असून चालणार नाही, तर सुज्ञ असावे लागेल.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

सावधान! TRAI च्या नावाने फोन करून दिली जातेय धमकी, मोबाईल युजर्सना सरकारने केलं अलर्ट