Manoj Jarange Patil | जरांगेंचा भुजबळांविषयी गौप्यस्फोट! मग अजितदादांना कुठं पाठवतो? फडणवीसांचं काय?

कोल्हापूर : Manoj Jarange Patil | जालन्यातील अंबड येथे झालेल्या ओबीसी आरक्षण (OBC Reservation) बचाव एल्गार सभेत अजित पवार गटाचे (Ajit Pawar Group) मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनाचे नेते मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांचा एकेरी उल्लेख करत वैयक्तिक टीका केली. मंत्रिमंडळातील एका मंत्र्याने अशी टीका केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान, जरांगे यांनी देखील भुजबळांना त्यांच्याच भाषेत आणि परखड शब्दात प्रत्युत्तर दिले आहे.

भुजबळांविषयी गौप्यस्फोट करताना मनोज जरांगे म्हणाले, ते वेगळेच स्वप्न बघायलेत, मला तर आता असं कळालंय, मला माहिती नाही. पण, मला कळालंय. मी या व्यासपीठावरुन खोटं बोलणार नाही. ते म्हणालेत मला मुख्यमंत्री व्हायचंय. मग अजित दादांना कुठं पाठवतो, आणि देवेंद्र फडणवीसांचं (Devendra Fadnavis) काय. म्हणजे सगळ्यांना सोडून तुम्हालाच मुख्यमंत्री व्हायचंय. मग तर आमचा विषयच संपला. आम्हाला आरक्षणच मिळणार नाही.

कोल्हापूर शाहुनगरीत मराठा आरक्षण जनजागृतीसाठी मनोज जरांगे यांची सभा झाली. व्यासपीठावर कोल्हापूर संस्थानचे छत्रपती शाहु महाराज आणि माजी खासदार संभाजीराजे उपस्थित होते. यावेळी जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी भुजबळांचा समाचार घेतला.

मनोज जरांगे म्हणाले, वयाच्या मानाने ते आज काहीही बरळले. मी सासऱ्याच्या घरचं खातो, असेही म्हटले.
पण, तू तर आमचं खातो. आम्हा गरीब जनतेचं रक्त पिऊन तुम्ही मोठा झालास. त्यांना राज्यात अशांतता पसरवायची आहे,
त्यांना गोंधळ निर्माण करायचा आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे की, त्यांना रोखावं,
नाहीतर आम्ही जशास तसं उत्तर देऊ. यावेळी, दोन्ही राजेंनी टाळ्या वाजवून जरांगे यांना दाद दिली.

जरांगे पुढे म्हणाले, व्यक्ती म्हणून त्यांच्याबद्दल आदर होता. मात्र, एवढ्या मोठ्या माणसाने आज पातळी सोडली.
आम्ही आमच्या कष्टाचे खातो. घाम गाळतो. एक दिवसाच्या जेवणासाठी पैसे नव्हते, अशी तुमची परिस्थिती होती.
आज तुमच्याकडे कोट्यवधी रुपयांची संपत्ती आली कोठून? असा सवाल करत जरांगे यांनी भुजबळांचा भ्रष्टचार बाहेर काढला.

भुजबळांवर आरोप करताना जरांगे म्हणाले, तुम्ही गोचिडासारखे आमच्या जनतेचे रक्त शोषून करोडोची संपत्ती कमवली.
म्हणूनच तुम्हाला जेलमध्ये जाऊन बेसन-भाकरी खावी लागली.
गोरगरिबांचा तळतळाट तुम्हाला स्वस्थ घरात बसू देत नव्हता. त्यामुळेच तुम्ही तुरुंगात गेला. जे सत्य आहे ते बोललेच पाहिजे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

भुजबळांनी जरांगेंना राजकीय आव्हान देण्याची गरज काय होती? प्रकाश आंबेडकरांचा थेट सवाल