मनोज लोहिया नांदेड परिक्षेत्राचे नवे पोलिस महानिरीक्षक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – वरिष्ठ आयपीएस अधिकारी मनोज एस. लोहिया यांची नांदेड परिक्षेत्राच्या विशेष पोलिस महानिरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या असलेले विशेष पोलिस महानिरीक्षक प्रकाश प्रभाकरराव मुत्याल यांच्या बदलीचे आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येणार असल्याचे गृह विभागाकडून सांगण्यात आले आहे.

विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया हे सध्या राज्य रस्ते परिवहन महामंडळात मुख्य दक्षता अधिकारी म्हणून कार्यरत होते. यापुर्वी लोहिया यांनी मुंबई, पुण्यासह राज्यातील इतर ठिकाणी कर्तव्य बजावले आहे. अत्यंत कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून लोहिया यांच्याकडे पाहिले जाते. आता त्यांची नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like