मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाला नवे वळण; NIA तपासात धक्कादायक माहिती समोर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   मनसुख हिरेन हत्या प्रकरणावरून दिवसेंदिवस अनेक खुलासे होत आहे. तर कारमायकल रस्त्यावर स्फोटकांनी भरलेल्या हिरव्या रंगाच्या स्कॉर्पिओ कारप्रकरणी ४ मार्चच्या रात्री १० वाजेपासून ते ५ मार्चच्या सकाळी १०.३० वाजेपर्यंत मनसुख हिरेन सोबत नेमकं काय घडलं? याबाबत तपास केला असता त्यात धक्कादायक माहिती समोर आली होती. मात्र राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) तपासामध्ये आणखी एक धक्कादायक माहिती पुढं आली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, एक नवीन खुलासा झालेला आहे, की , ४ मार्चला मनसुख हिरेन व्हॉट्सअप कॉलवरून कोणाच्या तरी सतत संपर्कात होता आणि एक टप्पा आल्यावर हिरेन पूर्ण संपर्क झाला होता. हिरेन यांना बेशुद्ध करण्यात आलं होतं. ठाण्यातील गायमुख चौपाटी येथेही बेशुद्ध करण्यात आलं होतं आणि एका कारमध्ये टाकून हिरेन यांना गायमुख चौपाटी ते मुंब्रा रेतीबंदर असं एका कारमध्ये नेण्यात आलं तर ही कार निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची होती. तर दुसरं म्हणजे २ पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांनी या वेळेस कारला संरक्षण दिलं होतं आणि या २ पोलीस निरीक्षक यांनी त्यांच्या संरक्षणात बेशुद्धावस्थेत असलेल्या हिरेन यांना मुंब्रा रेतीबंदर खाडीपर्यंत पोहचवले. या २ पोलिसांनी वाझेंच्या कारला संरक्षण दिले कारण जर गायमुख चौपाटी ते मुंब्रा रेतीबंदर यादरम्यान जर पोलीस बंदोबस्त किंवा नाकाबंदी असती आणि या दरम्यान बेशुद्धावस्थेतील हिरेन ज्या कारमध्ये आहे. त्या कारला पोलिसांनी अडवले असते तर ती कार चेक न होता पुढे सोडली जावे, याकरता या २ पोलीस निरीक्षकांनी कारला संरक्षण दिले गेले होते.

दरम्यान, ४ मार्च रात्री मनसुख हिरेन ठाण्यातून आपल्या क्लासिक डेकॉर या दुकानातून घरी निघाले. यावेळेस त्याला त्याच्या मुलाने विचारलं इतक्या लवकर कुठे निघालात? तेव्हा ते म्हणाले, मला एक अर्जंट काम आहे, जावं लागेल. स्फोटकांनी भरलेल्या हिरव्या रंगाच्या कारबाबत चौकशीसाठी मला जावं लागणार आहे. तिथून हिरेन त्यांच्या नौपाडा येथील विकास पाम या सोसायटीत गेले आणि गडबडीत जेवण करून, हिरेन साडेआठच्या दरम्यान, घरातून निघाले. याबाबत घरच्यांकडून विचारपूस केली असता, कांदिवली क्राइम ब्रांचच्या तावडे नावाचे अधिकारी यांनी मला तपासा करता बोलावलं असून त्याकरता मी निघालो आहे. असे सांगून हिरेन निघाले. मात्र रात्री साडेदहानंतर हिरेन यांचा मोबाईल बंद झाला. त्यामुळे घरच्यांची चिंता वाढली, दरम्यान ५ मार्चच्या सकाळी १०.२५ च्या दरम्यान ठाण्यातील मुंब्रा रेतीबंदर येथे हिरेन यांचा मृतदेह सापडला होता,

तसेच निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचा फोन मुंबई पोलीस आयुक्तालयातील सीआययु या मुंबई गुन्हे शाखा ऑफिसमध्ये ठेवला होता. कारण हिरेन यांचा मृत्यू केव्हा झाला व हिरेनसोबत जे काही घडलं त्यावेळेस आपण तिथे नव्हतो हे दाखवण्याकरता वाझे याने आपला फोन मुंबई पोलीस आयुक्तालय कार्यालयातील सीआययु ऑफिसमध्ये ठेवला. तिथे पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या एका अधिकाऱ्याला त्या मोबाईलची देखरेख करण्यास ठेवण्यात आले होते. दरम्यान, जर कोणाचा फोन आला तर ‘सचिन वाझे बिझी आहेत’ असं त्या पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याला सांगण्यात आलं होतं. तपासात हे सर्व पुढं आल्यानंतर NIA ने वाझे यांचा ४ मार्च आणि ५ मार्च या २ दिवसांचा CDR काढला असता ४ मार्च रात्री आणि ५ मार्च या काळात वाझे याला एकही फोन आला नसून केवळ जाहिरातीचे ८ SMS आले होते. याचा अर्थ हिरेन यांची हत्येतून वाचवण्याकरता वाझे आणि त्याच्या टीमने लोकेशन डिफरन्स सी या प्रकारचा खेळ खेळला होता. मात्र लोकेशन व्यतिरिक्त तपास यंत्रणांकडे वाझे याच्या विरोधात इतके भक्कम पुरावे आहेत की लोकेशन डिफरेन्स पुरावे नष्ट करणे तपास यंत्रणांची दिशाभूल करणे हे सर्व खेळ सचिन वाझे याने खेळले असतील तरी येणार आहे. असे तपासवरून स्पष्ट करण्यात आल्याचे समजते.