Birthday SPL : संजय दत्तनं ‘अशा’ प्रकारे रात्रीतून बाजारातून गायब केल्या होत्या पत्नी मान्यताच्या ‘तसल्या’ सिनेमाच्या CD अन् DVD

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  बॉलिवूड स्टार संजय दत्त याची पत्नी मान्यता दत्त ही आज (दि 22 जुलै 2020) तिचा वाढदिवस साजरा करत आहे. आज आपण तिच्या वाढदिवसानिमित्त तिच्या काही खास गोष्टी जाणून घेणार आहोत. मान्यताचं खरं नाव काय आहे याबद्दल खूप कमी लोकांना माहित आहे.

मान्यतानं बी ग्रेड सिनेमातून केली होती करिअरची सुरुवात

मान्यता दत्तनं आपल्या करिअरची सुरुवात बी ग्रेड सिनेमातून केली होती. निमित वैष्णव या अभिनेत्यासोबत तिनं लव्हर्स लाईक अस या बी ग्रेड सिनेमात काम केलं होतं. हेच कराण होतं की, संजयनं मान्यता सोबत लग्न करण्याचं कळल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

संजयनं मार्केटमधील मान्यताच्या तसल्या सिनेमाच्या सर्व सीडी आणि डीव्हीडी हटवल्या

संजयनं मान्यताच्या या सिनेमाचे राईट्स 20 लाखांत खरेदी केली होते. याशिवाय मार्केटमधील सर्व सीडी आणि डीव्हीडी हटवण्यासाठीही संजयनं वेगळी शक्ती पणाला लावली होती. आज संजय आणि मान्यता यांना दोन मुलं आहेत. एक मुलगा आणि एक मुलगी.

मान्यता करू लागली फॅमिली बिजनेस

मन्यताचा जन्म 22 जुलै 1978 रोजी मुंबईत झाला होता. पंरतु तिची लहानाची मोठी मात्र दुबईत झाली होती. मान्यताला मोठी अॅक्ट्रेस व्हायचं होतं. मान्यताच्या विडलांचा दुबईत बिजनेस होता. परंतु त्यांच्या मृत्यूनंतर ती बिजनेस करू लागली.

2008 मध्ये ‘संजय-मान्यता’नं केलं लग्न

संजय आणि मान्यताची ओळख एका कॉमन फ्रेंडच्या ओळखीनं झाली होती. नंतर दोघं एकमेकांना डेट करू लागले. 2008 मध्ये दोघांनी लग्न केलं. त्यावेळी मान्यता 29 वर्षांची आणि संजय 50 वर्षांचा होता. 2010 साली तिनं दोन जुळ्या मुलांना जन्म दिला. शरान आणि इकरा अशी त्यांची नावं आहेत.

सध्या संजयच्या प्रॉडक्शन हाऊसची सीईओ आहे मान्यता

जेव्हा मान्यता आणि संजय सोबत होते तेव्हा अनेकजण त्यांच्या नात्यामुळं खुश नव्हते. यात त्याचे कुटुंबीय देखील आहेत. संजयचं जीवनही खूप संघर्षमय राहिलं आहे. त्याच्या कठिण काळात मान्यतानं त्याला साथ दिली. जीवनातील याच काळात मान्यतानं त्याच्या आयुष्यात एन्ट्री केली होती. आज संजय आणि मान्यता बॉलिवूडमधील मोस्ट लविंग कपलपैकी एक आहे. दोघांचंही एकमेकांवर खूप प्रेम आणि विश्वास आहे. मान्यता आता संजय दत्तच्या प्रॉडक्शन हाऊसची सीईओ आहे. संजयचं सर्व काम तिच सांभाळते.

कोण आहे मान्यता ? काय आहे तिचं खरं नाव ?

मान्यता दुबईत लहानची मोठी झाली आहे. तिचं खरं नाव दिलनवाज शेख आहे. तिला अभिनेत्री व्हायचं होतं. बॉलिवूडमध्ये तिनं आपलं नाव सारा खान ठेवलं होतं. इंडस्ट्रीत तिला याच नावानं ओळखलं जात होतं. परंतु प्रकाश झा यांच्या सिनेमात आयटम नंबर केल्यानंतर तिनं आपलं नाव बदलून मान्यता ठेवलं.