Mara Piya Ghar Aaya | सुपरहिट ‘मेरा पिया घर आया’ गाण्याचा येणार 2.0 रिमेक; दिसणार सनी लिओनीचा बोल्ड अंदाज, माधुरीने दिली प्रतिक्रिया

पोलीसनामा ऑनलाइन – Mara Piya Ghar Aaya | बॉलीवुडमध्ये एकेकाळी सुपरहिट ठरलेल्या अनेक गाण्यांचा रिमेक केला जात आहे. या गाण्यांमध्ये थोडा फार बदल करुन नव्या रंगात आणि नव्या ढंगात गाणी रिमेक केली जात आहे. सध्या सोशल मीडियावर माधुरी दीक्षितच्या एका सुपरहिट गाण्याच्या रिमेकची चर्चा सर्वत्र रंगली आहे. या गाण्यामध्ये आता अभिनेत्री माधुरी दीक्षित ऐवजी अभिनेत्री व मॉडेल सनी लिओनी झळकणार आहे. माधुरी दीक्षितने तिच्या गाण्याच्या रिमेकवर प्रतिक्रिया देखील दिली आहे. (Mara Piya Ghar Aaya)

1995 साली बॉलीवुडमध्ये ‘याराना’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. चित्रपटाबरोबरच या ‘याराना’ चित्रपटातील गाणीही तितकीच लोकप्रिय झाली होती. ‘याराना’ चित्रपटातील ‘मेरा पिया घर आया’ हे गाणे तर प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. हे गाणे अभिनेत्री माधुरी दीक्षितवर चित्रित झाले होते. आता याच गाण्याचं नवीन व्हर्जन येणार आहे. लवकरच ‘मेरा पिया घर आया 2.0’ हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या नवीन गाण्याची प्रदर्शनाआधीच जोरदार चर्चा रंगली आहे. या गाण्याचा टीझर देखील रिलीज झाला असून प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. (Mara Piya Ghar Aaya)

‘मेरा पिया घर आया 2.0’ या गाण्यामध्ये माधुरी दीक्षित ऐवजी सनी लिओनी दिसणार आहे.
गाण्याच्या टीझरमध्ये सनीने आपल्या अंदाजाने तापमान वाढवले आहे.
सनी लिओनीचा बोल्ड अंदाज ‘मेरा पिया घर आया 2.0’ या गाण्यामध्ये दिसणार आहे.
या गाण्याच्या टीझर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
माधुरी दीक्षितने देखील आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन या गाण्याचा टीझर स्टोरीमध्ये शेअर केला.
सोबतच तिने भावना व्यक्त करत लिहिले आहे की, “या गाण्याचं नवीन व्हर्जन पाहण्याची मी वाट बघत आहे.
तुम्हाला माझ्याकडून खूप शुभेच्छा.”

‘मेरा पिया घर आया 2.0’ हे गाणे उद्या (दि.08) रिलीज होणार आहे. हे गाणे नीती मोहन हिने गायले आहे. तसेच एन्बी आणि अनु मलिक यांनी गाण्याचे गीत लिहिले असून म्युझिक देखील या दोघांनी दिले आहे. सनी लिओनीवर ‘मेरा पिया घर आया 2.0’ हे गाणे चित्रित करण्यात आले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

GST Council Meet | एक्स्ट्रा न्यूट्रल अल्कोहोल जीएसटीच्या कक्षेत येणार नाही; राज्यांना अधिकार