Maratha Agitators On Sanjay Raut | संजय राऊत चले जाओ…मराठा आंदोलकांनी संजय राऊतांना घेरले, जोरदार घोषणाबाजी

ADV

दौंड : Maratha Agitators On Sanjay Raut | कोणत्याही राजकीय नेत्याला गावात येऊ द्यायचे नाही, असे मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलकांनी ठरवले असल्याने त्याचा फटका सत्ताधारी नेत्यांसह विरोधी पक्षांच्या नेत्यांना सुद्धा बसत आहे. आज दौंडमध्ये (Daund) आलेले शिवसेना ठाकरे गटाचे (Shivsena UBT Group) खासदार संजय राऊत यांची पत्रकार परिषद झाल्यानंतर मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. (Maratha Agitators On Sanjay Raut)

ADV

चले जाओ, चले जाओ संजय राऊत चले जाओ राऊत.. एक मराठा लाख मराठा. छत्रपती शिवाजी महाराज की..जय भवानी जय शिवाजी.. जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आगे बढो हम तुम्हारे साथ है.. आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं..अशी जोरदार घोषणाबाजी संजय राऊत यांच्या समोर केली. (Maratha Agitators On Sanjay Raut)

दरम्यान, संजय राऊत यांनी दौंडमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्य सरकारवर गंभीर आरोप करताना म्हटले की, आगामी निवडणुकांसाठी तुरुंगातील कैदी बाहेर काढले जात आहेत. कैद्यांना राजकारणात आणण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे.

संजय राऊत म्हणाले, आगामी निवडणुकीत भाजप आणि शिंदे या गुन्हेगारांचा निवडणुकीत दडपशाहीसाठी वापर करणार आहे. यासाठी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी त्यांच्या नेत्यांचे एक पथक नेमले असून
गुन्हेगारांना जामिनावर बाहेर काढण्याचे काम सरकार करत आहे.
कोणता पोलीस अधिकारी जामिनावर सुटून सरकारसाठी काम करत आहे याची माहिती मी लवकरच उघड करणार आहे.

राऊत म्हणाले, आज संजय सिंग जेलमध्ये आहेत. उद्या दौंडचे आमदार जेलमध्ये असू शकतात.
मोदींनी ज्यांच्यावर आरोप केले ते आज मंत्रिमंडळात आहेत. २०२४ नंतर तुमच्यावर कारवाई होऊ शकते.
आज जे भाजपमध्ये गेले आहेत ते २०२४ ला आमच्या दारात उभे राहतील. २४ ला नरेंद्र मोदी येणार नाहीत.

राऊत म्हणाले, सध्या ज्या पद्धतीने राजकारण सुरू आहे ते लोकांना आवडलेले नाही.
सरकारने पालिका जिल्हा परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची हिंमत दाखवावी.
मोदींनी प्रचाराला यावे. एक महिना राहावे, आणि मुंबई महापालिका जिंकून दाखवावी.

संजय राऊत म्हणाले, भाजपने १२ गावचे लफंगे घेऊन पक्ष स्थापन केला आहे.
त्यांच्याकडे स्वतःचे असे काय आहे. बारामतीत भाजपाचा स्वतःचा उमेदवार कोण आहे.
शुद्ध आणि हिंदुत्ववादी उमेदवार आहे का. बारामतीत शरद पवार जो उमेदवार देतील तोच निवडून येईल.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shambhuraj Desai On CM Eknath Shinde | एकनाथ शिंदेंना विधान परिषदेवर जाण्याची गरज नाही, शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांचा विश्वास