Maratha Community On Lok Sabha Election 2024 | मराठा समाजाची लोकसभा निवडणुकीतील भूमिका आज स्पष्ट होणार, राज्याच्या राजकारणावर होणार मोठा परिणाम

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Maratha Community On Lok Sabha Election 2024 | मराठा आरक्षण आंदोलनात (Maratha Reservation Andolan) मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याविरोधात थेट भूमिका घेतल्याने महायुती सरकारने (Mahayuti Govt) जरांगे यांच्यावर कारवाईचा फास आवळला होता. त्यांच्याविरोधात काही जणांकडून वक्तव्य केली जात आहेत. यामुळे संतापलेल्या जरांगे यांनी लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाला योग्य ती भूमिका घेण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार, गावोगावी बैठका झाल्या असून त्याचे अहवाल जरांगे यांच्याकडे पाठवले आहेत. आज यावर जरांगे निर्णय घेणार आहेत. याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.(Maratha Community On Lok Sabha Election 2024)

लोकसभा निवडणूक २०२४ साठी प्रत्येक मतदारसंघात एकापेक्षा जास्त उमेदवार देण्याचे मराठा समाजाने ठरवले होते. परंतु, अंतरवाली सराटीत झालेल्या बैठकीत हा निर्णय रद्द करण्यात आला. तसेच प्रत्येक मतदारसंघातून एकच अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यासंदर्भात विचार झाला. यानंतर मनोज जरांगे यांनी मतदारसंघनिहाय बैठका घेऊन समाजाचे मत ठरवण्यास सांगितले होते. त्यानुसार बैठका पार पडल्या आहेत.

आज या सर्व बैठकांचा आढावा घेऊन निर्णय जाहीर करण्यात येणार आहे.
मनोज जरांगे पाटील काय घोषणा करतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
मनोज जरांगे हे पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती देणार आहेत.
प्रत्येक जिल्ह्यात अपक्ष उमेदवार द्यायचा, अनेक उमेदवार उभे करायचे, कोणत्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा का,
की मराठा समाजाने निवडणुकीत प्रत्यक्ष उतरायचे हे लवकरच समोर येईल.

दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनीही मनोज जरांगे यांची भेट घेऊन नवीन समीकरण मांडले आहे.
याबाबत देखील मनोज जरांगे कोणता निर्णय घेतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

मराठा समाज हा राज्यातील एक मोठा समाज असल्याने त्याची भूमिका ही एकुणच लोकसभा निवडणुकीवर मोठा परिणाम
करणारी असेल हेही तितकेच खरे आहे. यामुळे जरांगेंच्या आजच्या निर्णयानंतर विविध राजकीय समीकरणे बदलणार आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Vijay Shivtare On Baramati Lok Sabha | बारामतीत लढायचे की नाही? आज शिवतारेंची सासवडमध्ये बैठक, कार्यकर्त्यांना विचारून घेणार निर्णय

Pune Kondhwa Crime | तरुणीला कीस करुन अश्लील चाळे, कोंढवा परिसरातील घटना

Prakash Ambedkar On Lok Sabha Election 2024 | प्रकाश आंबेडकरांकडून नव्या समीकरणाचे संकेत, म्हणाले ”महाराष्ट्रात नव्या राजकारणाची सुरूवात…”