Maratha Reservation : ‘…. तर परिणाम संपूर्ण राज्यभरात पहायला मिळतील’, विनायक मेटेंचा सरकारला इशारा (व्हिडीओ)

बीड : पोलीसनामा ऑनलाइन –  मराठा समाजावरील अन्याय सरकारने दूर करावा. अन्यथा मराठा समाजाला सरकारचं भविष्य ठरवावं लागेल, असा इशारा शिवसंग्राम  संघटनेचे नेते विनायक मेटे (vinayak mete) यांनी दिला आहे. राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात लवकर निर्णय घ्यावा. अन्यथा मागील वर्षीप्रमाणे मराठे मोर्चे सुरु होतील, असेही विनायक मेटे यांनी म्हटले आहे. बीडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मराठा मोर्चावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

सरकारने दखल घेतली नाही, तर…

मोर्चाला झालेली गर्दी पाहता, तरुणांमध्ये किती रोष आहे हे दिसत आहे.
परंतु हा रोष सरकारला दिसत नाही. म्हणून हे सर्वजण संघर्ष करण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत.
जर सरकारने याची दखल घेतली नाही, तर याचे परिणाम संपूर्ण राज्यभरात पहायला मिळतील, असा इशारा विनायक मेटे (vinayak mete) यांनी दिला आहे.

हा सरकारचे वाभाडे काढणारा मोर्चा

विनायक मेटे म्हणाले, मी आता जसं आवाहन केलं तसंच आवाहन सुरुवातीपासून करतो आहे.
हा मूक मोर्चा नाही घोषणा देत सरकारचे वाभाडे काढणारा मोर्चा आहे.
अन्यायाला वाचा फोडणारा मोर्चा आहे, असेही मेटे म्हणाले.

कोरोना नियमांचे उल्लंघन

मराठा आरक्षणाच्या मोर्चासाठी बीड येथील शिवाजी चौकात मोठ्या संख्येने लोक जमले होते.
यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
मोर्चा प्रसंगी कोरोना नियमां चे सर्रास उल्लंघन झाल्याचे पहायला मिळाले.

आगोदर मुक मोर्चा नंतर घोषणा

छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलातून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने निघाला.
आगोदरचे मराठा मोर्चे हे मुक मोर्चे होते.
परंतु आजच्या मोर्चात मोठ्याप्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली.

नाना पेटोलेंच्या विधानावरून राऊतांनी लगावला टोला, म्हणाले – ‘…तर त्या सारखी ऐतिहासिक गोष्ट नाही’

Sanjay Raut : …म्हणून आता शिवसेना पाठीत खंजीर खुपसते, या विधानावर कोणीही विश्वास ठेवणार नाही

भारत इथेनॉलवर आधारित प्रकल्प सुरु करेल, PM मोदींनी केले पुण्यातील इथेनॉल प्रोजेक्टचे उद्घाटन

जर तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचाय तर ‘हा’ सर्वोत्तम पर्याय, मोदी सरकार देखील करणार मदत; जाणून घ्या

भारतीय महिला फेडरेशनची मागणी, म्हणाले – ‘कष्टकरी, कामगारांना कोरोनाची लस रेशनकार्डवर उपलब्ध करून द्या’

सरकारचा नवा नियम ! इलेक्ट्रिक कार-बाईक खरेदीवरील खर्च कमी होणार, मिळणार नवीन सुविधा

Pune News : पुण्यात आघाडी अथवा युती झाली तरी शिवसेना 80 जागांवर लढणार – संजय राऊत