आंदोलन कर्त्यामध्ये विश्वास निर्माण करण्यात सरकार अपयशी ठरले : खासदार राजू शेट्टी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन 

राज्यात मराठा समाजाचे 58 मोर्चे शांततेमध्ये काढण्यात आले. त्या मोर्चाची दखल सरकारने घेतली नाही. त्यात लालफितीच्या कारभारामुळे चळवळीतील कार्यकर्त्यांना आक्रमक व्हावे लागले. हे मागील आठवड्याभरापासून राज्यात होत असलेल्या आंदोलनामधून दिसून येत आहे. तर हिंसक घटनेचे समर्थन करीत नाही. तर या आंदोलकामध्ये विश्वास निर्माण करण्यात हे सरकार अपयशी ठरल्याने आंदोलानास हिंसक स्वरूप मिळाले आहे.अशा शब्दात खासदार राजू शेट्टी यांनी पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वार्तालापा प्रसंगी टीका केली.

या वेळी संघाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील आणि सरचिटणीस पांडुरंग सांडभोर उपस्थित होते.यावेळी राजू शेट्टी यांनी अनेक प्रश्नावर भूमिका मांडत सरकारच्या कार्यपध्द्तीवर सडकून टीका देखील केली.

यावेळी राजू शेट्टी म्हणाले की,तोडफोड केलेली आंदोलन दीर्घकाळ टिकत नाही.मराठा समाजाच्या आरक्षणाला सर्व जाती आणि धर्मानी पाठींबा दर्शवला असून आंदोलन शेवटच्या टप्प्यात आले आहे. मराठा समाजला आरक्षण मिळणारच आहे.त्यांनी संयम बाळगावा.असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
[amazon_link asins=’B01N5O1DUF’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’5d781cbe-94c9-11e8-80e3-61d6d0f17337′]
ते पुढे म्हणाले की,आगामी निवडणुकीमध्ये दीड पट हमी भाव देण्याचे लेखी आश्वसन जो पक्ष देईल. त्यांच्या सोबत जाण्याचा विचार करू.मात्र अद्याप कोणासोबत जाणार हे निश्चित केले नाही.मोदींनी या निवडणुकीत आमची फसवणूक केल्याने आम्ही त्यांची साथ सोडल्याचे त्यांनी सांगितले. तसेच यापुढे कधी ही मोदी सोबत जाणार नसल्याचे त्यांनी ठाम पणे सांगितले.त्याचबरोबर आगामी लोकसभा निवडणुकीत हातकणंगले, माढा,कोल्हापूर, सांगली,बुलढाणा आणि वर्धा या सहा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे.याच मतदारसंघासाठी आग्राही असणार आहे.

दूध दरवाढ देण्याबाबत सदाभाऊ खोत यांची भूमिका काय आहे का ? या प्रश्नावर ते म्हणाले की,सदाभाऊ नी अगोदर अभ्यास करावा.सदाभाऊंनी आदिवासीचा दूध संघ तोट्यात घालावला.अशा शब्दात त्यांनी सदाभाऊवर टीका केली.
[amazon_link asins=’B077FBWSTC’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’85131eaa-94c9-11e8-89ce-f75ab2abf152′]

तुम्ही जुन्या मित्राना आगामी निवडणुकीत सोबत घेणार का ? त्यावर ते म्हणाले की,ज्यावेळी ते आमच्या सोबत होते.तेव्हा सर्व सहमतीने काढून टाकले असून त्यातील महादेव जानकर यांनी एनडीए सोडलं. तर त्यांना बरोबर घेण्याचा विचार करू असे त्यानी सांगितले. आधीचे सरकार नाठाळ होते.मात्र काही ठराविक काळानंतर चर्चेसाठी यायचे. मात्र सद्याचे सरकार हे जगातील अंतिम सत्य आम्हाला कळाले अशा अविर्भावात असते.अशा शब्दात त्यांनी मोदीवर टीका केली.