Maratha Reservation | मुख्यमंत्री आणि जरांगे यांच्यात मोबाईलवर चर्चा, रात्री उशीरा मंत्री सामंतांनी घेतली भेट

जालना : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी काल मंगळवारी शासनाला निर्णय घेण्यासाठी एक महिन्याचा कालावधी देण्याचे मान्य करून काही अटी घातल्या होत्या. यानंतर रात्री उशीरा उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी जरांगे यांची उपोषणस्थळी भेट घेतली. यावेळी सामंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि जरांगे यांच्यात मोबाईलवर चर्चा घडवून आणली. (Maratha Reservation)

यावेळी मंत्री संदीपान भुमरे (Sandipan Bhumre), आ. राजेश टोपे (Rajesh Tope), माजी मंत्री अर्जुन खोतकर (Arjun Khotkar), आ. नारायण कुचे (Narayan Kuche) उपस्थित होते. सरकारच्या वतीने आलेल्या या नेत्यांनी मराठा आंदोलनाचे पदाधिकारी आणि जरांगे यांच्याशी सुमारे दोन ते अडीच तास चर्चा केली.

यावेळी सामंत म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकारात्मक आहेत. जरांगे यांनी त्यांची भूमिका मुख्यमंत्र्यांसमोर मांडली आहे. त्यांचा काही निरोप असेल तर मी त्यांना देईन. त्यांचे उपोषण सुटले पाहिजे, त्यांची प्रकृती चांगली राहिली पाहिजे, ही शासनाची भूमिका आहे. कायदेशीर बाबी पूर्ण करण्यासाठीच ३० दिवसांचा कालावधी मागितला आहे. मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळाले पाहिजे, यासाठी आम्ही सर्वजण राजकारण बाजूला ठेवून काम करीत आहोत असे ते म्हणाले.

मुख्यमंत्र्यांशी काय बोलणे झाले

मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेची माहिती देताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, आरक्षणावर, तब्येतीवर आमची चर्चा झाली.
पहिल्या समितीने काम केले नाही. पहिले तीन महिने वाया गेले. एक महिन्याचा वेळ आम्ही दिला आहे.
आता प्रत्यक्ष यावे म्हणजे आता आम्ही आमरण उपोषण सोडून साखळी उपोषण करू, असे मी मुख्यमंत्री शिंदे यांना म्हटले.
मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्या सकाळी सांगतो, असा निरोप दिला आहे, असे जरांगे म्हणाले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

13 September Rashifal : कन्या, तुळ आणि कुंभ राशीला नोकरीसाठी चांगला दिवस, वाचा दैनिक भविष्य