Maratha Reservation | जरांगे पाटलांच्या सभेत तरुणाचा गोंधळ घालण्याचा प्रयत्न, म्हणाला – ‘मला बोलू द्या, नाहीतर मी आत्महत्या करेल’

राजगुरूनगर : मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनाचे नेते मनोज जरांगे (Manoj Jarange) यांची आज राजगुरूनगरमध्ये सभा सुरू असताना एका युवकाने मंचावर येऊन माईक हातात घेऊन गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. मला बोलू द्या अन्यथा मी आत्महत्या (Suicide) करेन, अशी धमकी सुद्धा युवक देत होता. पोलिसांनी त्याला समजावून बाजूला नेले. (Maratha Reservation)

मराठा आंदोलनादरम्यान (Maratha Reservation) ४७ पेक्षा जास्त मराठा बांधवांनी आत्महत्या केल्या. त्यासर्वांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सर्वजण उभे राहिले असताना एक तरुण अचानक स्टेजवर चढला. त्याने जरांगे यांचा माईक हिसकावून मला बोलायचे आहे असे म्हटले. पण सभा संपल्याने आयोजकांनी त्यास नकार दिला. त्यावरून त्याने गोंधळ करण्याचा प्रयत्न केला

पोलिसांनी तरुणाची समजूत काढून त्याला स्टेजवरून खाली नेले. यावेळी जरांगे यांनी, त्या तरुणाची समजूत काढली आहे.
त्यांना बोलायचे होते, पण नियोजित कार्यक्रमात बोलता आले नाही. त्यांचे मनपरिवर्तन झाले आहे.
मराठा आंदोलनाला गालबोट लागावे हेच सरकारला हवे आहे. पण कोणीही गोंधळ करू नये, असे आवाहन केले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | हवेली क्रमांक 24 चे सहदुय्यम निबंधक निलंबित, 24 कोटी मुद्रांक शुल्क कमी आकारल्याने कारवाई

Pune Police Mcoca Action | मांजरी परिसरात दहशत माजवणाऱ्या अमोल आडेगावकर व त्याच्या 5 साथीदारांवर ‘मोक्का’! पोलीस आयुक्तांकडून आतापर्यंत 70 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर MCOCA

MNS Vasant More – MNS Sainath Babar | वसंत मोरेंच्या उमेदवारीसाठी साईनाथ बाबरांची भूमिका महत्वाची ठरणार? शहराध्यक्षांनी स्वत:च्या उमेदवारीबाबत म्हटले…