Maratha Reservation | मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय, भाजप नेत्याच्या अध्यक्षतेखाली नेमली मंत्रिमंडळ उपसमिती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मोठा निर्णय घेतला आहे. मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या अध्यक्षतेखाली 6 जणांची मंत्रिमंडळ उपसमिती (Cabinet sub-Committee) गठीत करण्यास मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे.

या समितीत महसूल मंत्री (Revenue Minister) राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrishna Vikhe-Patil), ग्रामविकास मंत्री (Rural Development Minister) गिरीश महाजन (Girish Mahajan), बंदरे मंत्री (Ports Minister) दाद भुसे (Dada Bhuse), राज्य उत्पादन शुल्क मंत्री (State Excise Minister) शंभुराज देसाई (Shambhuraj Desai), उद्योग मंत्री (Industries Minister) उदय सामंत (Uday Samant) यांचा समावेश आहे. ही समिती राज्य मागासवर्ग आयोगाकडून (State Commission for Backward Classes) मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक स्थिती तसेच इतर संलग्न बाबींबाबत अहवालातील शिफारशींवर वैधानिक कार्यवाही करणार आहे. (Maratha Reservation)

दरम्यान, यापूर्वीच्या भाजप-शिवसेना युतीच्या (BJP-Shivsena Alliance) काळातही चंद्रकांत पाटील यांच्याकडेच या उपसमितीची जबाबदारी होती. त्या समितीत सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सदस्य होते. चंद्रकांत पाटील यांनी पुढाकार घेऊन सारथी संस्थेची (Sarathi Sanstha) स्थापना केली.

मराठा मोर्चा समन्वयकांचा इशारा

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण (Reservation in OBC Category) द्यावे.
हा निर्णय 30 दिवसांच्या आत घ्यावा, अन्यथा राज्य शासनातील अधिकाऱ्यांनी घटनाबाह्य पद्धतीने घेतलेल्या
आरक्षणाचा लाभ न्यायालयात आव्हान देऊन रोखू, असा इशारा राज्यातील मराठा मोर्चा (Maratha Morcha)
समन्वयकांनी दोन दिवसांपूर्वी सोलापुरात दिला. यावेळी येथील सकल मराठा समाज (Sakal Maratha Samaj),
मराठा क्रांती मोर्चा (Maratha Kranti Morcha), मराठा ठोक मोर्चा (Maratha Thok Morcha)
या संघटनांच्या वतीने रविवारी छत्रपती शिवाजी प्रशालेत मराठा आरक्षण परिषद घेण्यात आली.

Web Title :- Maratha Reservation | maratha reservation cm eknath shinde appointed of three member subcommittee

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Low Blood Pressure झाल्यास ताबडतोब करा ‘या’ 4 पदार्थांचे सेवन, कंट्रोल होईल BP

Fenugreek Benefits | भाजी एक, फायदे अनेक ! शुगर आणि ब्लड प्रेशर सारखे 11 धोकादायक आजार जातील पळून