Maratha Reservation | मराठा आरक्षण ओबीसी कोट्यतूनच द्यावे लागणार – ॲड. पुरुषोत्तम खेडेकर

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Maratha Reservation | मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष ॲड. पुरुषोत्तम खेडेकर (Purushottam Khedekar), संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते गंगाधर बनबरे, सचिव सौरभ खेडेकर, पुणे जिल्हा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. मिलिंद द. पवार (Adv Milind Pawar) यांच्यामधे पुण्यात एका कार्यक्रमात मराठा आरक्षण व सद्यस्थिती यावर विस्तृतपणे चर्चा झाली. या प्रसंगी पुरुषोत्तम खेडेकर यांनी ॲड. मिलिंद पवार यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित स्वलिखीत तसेच महापुरुषांच्या जीवनावर आधारित ग्रंथ भेट देऊन ॲड. पवार यांचा सन्मान केला. या प्रसंगी माजी आमदार रेखाताई खेडेकर, जिजाई प्रकाशनाचे किशोर कडू तसेच ॲड. हर्षवर्धन पवार हे उपस्थित होते. (Maratha Reservation)

मराठ्यांना आरक्षण हे ओबीसी कोट्यातूनच (OBC Quota) द्यावे लागेल तरच ते आरक्षण कायमस्वरूपी व टिकाऊ असेल हि मागणी मराठा सेवा संघाने फार पूर्वीपासून लाऊन धरली होती व आहे. परंतु वेळोवेळी राज्यकर्त्यांनी त्यात राजकारण करीत आरक्षणाच्या मागणीकडे दुर्लक्ष केले ही वस्तुस्थिती आहे. (Maratha Reservation)

आता पुन्हा नव्याने मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या आंदोलनातून पून्हा याच मागणीने जोर धरला आहे. मराठा समाज आता आक्रमक होताना दिसत आहे. सरकारने मराठ्यांना कायम स्वरुपी टिकणारे आरक्षण देऊ असे पुन्हा एकदा नव्याने आश्वासन दिले आहे. त्यासाठी सरकारने काही दिवसांचा अवधी मागून घेतला होता. परंतु तसे न झाल्यास परिस्थिती हाताबाहेर जाऊन, मराठा समाजाची फसवणूक झाल्याची भावना निर्माण होऊन महाराष्ट्रात दंगल सद्रूष्य परिस्थिती निर्माण होऊ शकते. परंतु मराठा समाजाने आजपर्यंत संयम ठेवला आहे व भविष्यात देखील संयम ठेवतील अशी अपेक्षा पुरुषोत्तम खेडेकर यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.

तसेच पुढची रणनीती ठरविण्यासाठी आवश्यकतेनुसार लवकरच संभाजी ब्रिगेड तसेच मराठा सेवा संघाच्या अन्य
संलग्न संस्था यांच्याशी समन्वय साधून बैठकांचे आयोजन करून पुढील धोरणात्मक निर्णय घ्यावे लागतील असे
ॲड. पुरुषोत्तम खेडेकर यांनी नमूद केल्याचे ॲड. मिलिंद पवार यांनी सांगितले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MH CET 2024 Updates | महाराष्ट्र CET परीक्षा १६ एप्रिल ते २ मे दरम्यान, वेळापत्रक जाहीर

Walking Benefits | केवळ इतके मिनिटे पायी चालल्याने येणार नाही हार्ट अटॅक, जाणून घ्या आश्चर्यकारक फायदे