MH CET 2024 Updates | महाराष्ट्र CET परीक्षा १६ एप्रिल ते २ मे दरम्यान, वेळापत्रक जाहीर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – MH CET 2024 Updates | अभियांत्रिकी, औषधनिर्माण आणि कृषी अभ्यासक्रम प्रवेशासाठी एमएचटी-सीईटी परीक्षा (CET Exams) १६ एप्रिल ते २ मे दरम्यान होणार आहे. सीईटी कक्षातर्फे घेण्यात येत असलेल्या या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक जाहीर (MH CET 2024 Updates) आहे.

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने (CET सेल) पदवी आणि पदव्युत्तर व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी आवश्यक सामायिक प्रवेश परीक्षेचे (MHT CET) संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार अभियांत्रिकी, औषधनिर्माण आणि कृषी अभ्यासक्रम प्रवेशासाठीची एमएचटी-सीईटी परीक्षा १६ एप्रिल ते २ मे या काळात होईल. या सीईटीच्या गुणांद्वारे गुणवत्तेनुसार विद्याथ्र्यांना केंद्रीय प्रवेश प्रक्रियेतून प्रवेश दिला जातो. (MH CET 2024 Updates)

महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (CET) सेलने MAH MBA CET, MMS CET, MAH MCA CET, MHT CET,
MAH LLB 5 Years CET, MAH B.Ed CET, MAH BHMCT CET, MAH BPlanning CET, MAH MPEd या
परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. MH Common Entrance Test ने जाहीर केल्या प्रमाणे या परीक्षा मार्च २०२४ ते
मे २०२४ या कलावधीत होतील.

संपूर्ण संभाव्य वेळापत्रक वेबसाईट cetcell.mahacet.org वर पहा.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar On Rohit Pawar | महाराष्ट्रात आणखी एका काक-पुतण्यात संघर्ष, रोहित पवारांच्या आरोपावर अजित पवारांचे रोखठोक प्रत्युत्तर

ACB Trap Case | लाच घेताना भूमी अभिलेख कार्यालयातील उप अधीक्षक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Pune Crime News | मायलेकीचे मृतदेह धक्कादायक अवस्थेत आढळले, नातेवाईकांनी पतीला पोलिसांसमोर चोपले; पुणे जिल्ह्यातील धक्कादायक घटना