Walking Benefits | केवळ इतके मिनिटे पायी चालल्याने येणार नाही हार्ट अटॅक, जाणून घ्या आश्चर्यकारक फायदे

नवी दिल्ली : Walking Benefits | आजकाल हृदयविकाराचा धोका खूप वाढला आहे. हृदयविकारांमध्ये हार्ट अटॅक (Heart Attack) आणि कार्डिएक अरेस्टसारख्या (Cardiac Arrest) जीवघेण्या स्थितींचा समावेश होतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, हृदयरोगामुळे दरवर्षी सुमारे १७.९ दशलक्ष लोकांचा मृत्यू होतो. (Walking Benefits)

पण दररोज फक्त २१ मिनिटे चालल्याने हृदयविकाराचा (Heart Disease) धोका कमी होऊ शकतो, असे एका अभ्यासात आढळले आहे. चालण्याचे फायदे आणि हृदयरोग यांच्यातील संबंध जाणून घेऊया.

हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या संशोधकांनी १५ वर्षे ४५,००० हून अधिक लोकांचा अभ्यास केला. त्यांना असे आढळले की जे लोक दिवसातून २१ मिनिटे चालतात त्यांना हृदयविकाराने मरण्याचा धोका, अजिबात चालत नसलेल्या लोकांपेक्षा ३०% कमी असतो. संशोधनाच्या निष्कर्षावरून समजते की चालणे हा हृदयरोगाचा धोका कमी करण्याचा एक प्रभावी मार्ग आहे. जर हृदयविकाराचा धोका कमी करायचा असेल तर दररोज किमान २१ मिनिटे चाला. (Walking Benefits)

दररोज २१ मिनिटे चालण्याचे इतर फायदे
खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, तंबाखूचे सेवन, मद्यपान आणि शारीरिक निष्क्रियता यामुळे हृदयविकार आणि स्ट्रोकचा धोका वाढतो. जे दररोज फक्त २१ मिनिटे चालण्याने कमी करता येते. दररोज २१ मिनिटे चालणे देखील खालील फायदे देते. जसे-

  • हृदयविकाराचा धोका कमी होतो.
  • कोलेस्ट्रॉल नियंत्रित होते.
  • हाय ब्लड प्रेशर नियंत्रित होते.
  • टाईप २ डायबिटीजचा धोका कमी होतो.
  • अनेक प्रकारच्या कर्करोगांचा धोका कमी होतो.
  • तणाव, नैराश्यासारख्या मानसिक समस्या कमी होतात.
  • हाडे मजबूत राहतात.
  • स्मरणशक्ती तीक्ष्ण होते.
  • शरीराचे वजन नियंत्रणात राहते.
  • उत्साही वाटते.

लाईफस्टाईलमध्ये कोणते बदल करावे?

  • सॅच्युरेटेड आणि ट्रान्स फॅट्स युक्त पदार्थांपासून दूर राहा.
  • अल्कोहोल आणि धूम्रपानापासून दूर राहा.
  • शरीराचे वजन नियंत्रणात ठेवा.
  • रोज ताजी फळे आणि हिरव्या भाज्या खा.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar On Rohit Pawar | महाराष्ट्रात आणखी एका काक-पुतण्यात संघर्ष, रोहित पवारांच्या आरोपावर अजित पवारांचे रोखठोक प्रत्युत्तर

ACB Trap Case | लाच घेताना भूमी अभिलेख कार्यालयातील उप अधीक्षक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Pune Crime News | मायलेकीचे मृतदेह धक्कादायक अवस्थेत आढळले, नातेवाईकांनी पतीला पोलिसांसमोर चोपले; पुणे जिल्ह्यातील धक्कादायक घटना