Maratha Reservation | नांदेडमध्ये खासदार प्रताप पाटलांच्या गाड्यांची तोडफोड, गावबंदी असतानाही ताफा गावात आला

नांदेड : मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनाची तीव्रता राज्यभरात वाढू लागली आहे. साखळी उपोषण आणि राजकीय नेत्यांना गावबंदी आंदोलन मराठा आंदोलकांनी ठिकठिकाणी सुरू केल्याने तणाव वाढू लागला आहे. दरम्यान, काल रात्री नांदेडमध्ये खासदार प्रताप पाटील चिखलीकर (Pratap Patil Chikhalikar) यांच्या ताफ्यातील वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. (Maratha Reservation)

मराठा आरक्षणासाठी गांवबंदी असतानाही खासदार पाटील यांच्या वाहनांचा ताफा गावात आल्याने ही तोडफोड करण्यात आली. नांदेडच्या कंधार तालुक्यातील अंबुलगा गावात रात्री उशिरा ही घटना घडली आहे. (Maratha Reservation)

खासदारांसह त्यांच्यासोबत असलेल्या वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. सुदैवाने यात कुणीही जखमी झालेले नाही. खासदारांच्या सोबत असलेल्या पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. परंतु तोडफोडीत तीन वाहनांचे मोठे नुकसान झाले असल्याचे सांगण्यात येत आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Female Police Officer Suspended In Pune | पुण्यातील महिला पोलिस अधिकारी तडकाफडकी निलंबित, जाणून घ्या प्रकरण

Maratha Reservation | मराठा आरक्षण : जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आज बंद!

ACB Trap Case News | 1 लाखाची लाच घेताना ग्रामसेवक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Petrol-Diesel Price | शेअर मार्केटमध्ये घसरण, पेट्रोल-डिझेलवर परिणाम होणार? आजचे दर जाणून घ्या

Pune Crime News | व्यावसायिक वादातून एकावर कोयत्याने वार, मार्केट यार्ड परिसरातील घटना; बाळासाहेब मारणेसह 5 जणांवर FIR