Petrol-Diesel Price | शेअर मार्केटमध्ये घसरण, पेट्रोल-डिझेलवर परिणाम होणार? आजचे दर जाणून घ्या

मुंबई : Petrol-Diesel Price | भारतीय शेअर बाजारात (Indian Stock Market) मागील ६ दिवसांत गुंतवणूकदारांचे (Investor) तब्बल २० लाख कोटी रुपये बुडाले आहेत. याचा परिणाम पेट्रोल-डिझेलच्या दरांवरही होण्याची भिती सर्वसामान्यांना वाटत आहे. दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी घट झाली असली तरी देशातील पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol-Diesel Price) मात्र स्थिर आहेत. आज मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये तर डिझेल ९४.२७ रु. प्रति लिटर दराने विकले जात आहे.

व्यवहाराच्या शेवटच्या सत्रात ब्रेंट आणि क्रूड ऑईलमध्ये २ टक्क्यांची मोठी घसरण झाली होती. परंतु देशांतर्गत बाजारात पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. आज २७ ऑक्टोबरलाही पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये शेवटचा बदल २२ मे २०२२ रोजी झाला होता. (Petrol-Diesel Price)

देशातील पेट्रोल-डिझेलचे दर

  • दिल्ली – पेट्रोल ९६.७२ रुपये, डिझेल ८९.६२ रु. प्रति लिटर
  • मुंबई – पेट्रोल १०६.३१ रुपये, डिझेल ९४.२७ रु. प्रति लिटर
  • कोलकाता – पेट्रोल १०६.०३ रुपये, डिझेल ९२.७६ रु. प्रति लिटर
  • चेन्नई – पेट्रोल १०२.६३ रुपये, डिझेल ९४.२४ रु. प्रति लिटर

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Female Police Officer Suspended In Pune | पुण्यातील महिला पोलिस अधिकारी तडकाफडकी निलंबित, जाणून घ्या प्रकरण

Maratha Reservation | मराठा आरक्षण : जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आज बंद!

ACB Trap Case News | 1 लाखाची लाच घेताना ग्रामसेवक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात