Maratha Reservation | अजित पवारांच्या वक्तव्याला संभाजीराजेंचे उत्तर; म्हणाले – ‘आधी तुम्ही सर्व एकत्र या मग मी चर्चेसाठी नक्कीच येईन’

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – मराठा आरक्षणासाठी (Maratha reservation) कोल्हापूरमध्ये (Kolhapur) खासदार संभाजीराजे (MP Sambhajiraje) यांच्या अध्यक्षतेखाली आजपासून मूक आंदोलनास (Silent Movement) सुरुवात करण्यात आली. तत्पूर्वी संभाजीराजेंनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 4 जून रोजी आपल्याला भेटण्यासाठी फोन केला होता, असा मोठा खुलासा केला. पण तुम्ही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि अशोक चव्हाण (Ashok Chavan) एकत्र असतील त्यावेळी आम्ही चर्चेला नक्की येऊ असे सांगत एकांतात भेट घेण्याचे आपण टाळले, असेही संभाजीराजे (Sambhajiraje) यांनी स्पष्ट केलं.

काय म्हणाले होते अजित पवार ?
मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले की, आंदोलन करण्यापूर्वी संभाजीराजेंनी मुख्यमंत्र्यांशी (CM) एकदा चर्चा करायला हवी होती. आंदोलन करणे प्रत्येकाचा अधिकार (Everyone has the right to protest) असून ते जरूर करावं. ते करत असताना कोरोनाचा (Corona) प्रसार होऊ नये याची काळजी घ्यावी.

मला अजित पवारांचा फोन आला
अजित पवारांच्या (Ajit Pawar) वक्तव्याला उत्तर देताना संभाजीराजे (Sambhajiraje) म्हणाले की, मला अजित पवार यांचा फोन आला होता. मी त्यांना सांगितले की, समाजाच्या मागण्या (Demands of society) प्रत्यक्ष भेटून आपल्यासमोर मांडल्या आहेत. त्यावर तुम्ही चर्चा करावी (You should discuss). तुम्ही, मुख्यमंत्री आणि अशोक चव्हाण ज्यावेळी एकत्रित असाल त्यावेळी आम्हाला चर्चेसाठी बोलवा त्यावेळी आम्ही नक्की येऊ असे सांगितले.

म्हणून आंदोलनाची सुरुवात कोल्हापूरातून

खासदार संभाजीराजे यांनी मूक आंदोलन (Silent movement) शांततेत करण्याचे आवाहन केले आहे. यावेळी सर्वांनी कोरोना नियमांचे (corona rules) पालन करावे आशा सूचनाही त्यांनी केल्या आहेत. मंगळवारी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बोलताना संभाजीराजे म्हणाले की, वैचारिक पुरोगामी (Progressive Idology) अशी कोल्हापूरची (Kolhapur) पार्श्वभूमी आहे. त्यामुळे या आंदोलनाची सुरुवात कोल्हापुरातून करत आहोत. कोणत्याही लोकप्रतिनिधींना आंदोलना दरम्यान उलटसुलट बोलू नये. त्यांचा मानसन्मान (Respect) राखून त्यांच्याशी वागावे, हे मूक आंदोलन शिस्तीत पार पाडायला हवे असेही ते म्हणाले होते.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

Web Title : Maratha Reservation | mp sambhajiraje chhatrapati on maratha reservation silent movement replying to ajit pawar

हे देखील वाचा

Pune Crime News | लष्कर परिसरात तोडफोड केल्याप्रकरणी पुणे पोलिसांकडून एकाला अटक

Swargate Police Station |अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार; गळा दाबून जीवे मारण्याची दिली धमकी

Union Minister Raosaheb Danve । संजय राऊतांचं रावसाहेब दानवे यांना प्रत्युत्तर; म्हणाले – ‘आमच्याकडे चावी होती म्हणून सत्तेचं टाळं उघडलं’

Chhatrapati Sambhaji Raje । संभाजीराजेंचा नवा खुलासा; म्हणाले – ‘त्या’ दिवशी अजित पवारांचा फोन आला होता पण..