Prakash Ambedkar : ‘महाराष्ट्राच्या राजकारणाला शिळेपणा आलाय, संभाजीराजेंनी पुढाकार घेतला तर दूर होईल’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने मराठा आरक्षणात समस्या निर्माण झाली आहे. त्यावर राज्यपाल किंवा राष्ट्रपतीमार्फत पुनर्विचार याचिका हा सध्या कायदेशीर मार्ग आहे, असे मत वंचित विकास बहुजन पक्षाचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर Prakash Ambedkar यांनी व्यक्त केले. मराठा आरक्षणाचा प्रश्न राजसत्तेशिवाय सुटणार नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या शिळेपणा आला आहे, खासदार संभाजीराजेंनी पुढाकार घेतला तर ताजेपणा येईल, असेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले. खासदार संभाजीराजे यांनी आज (शनिवार) ॲड. प्रकाश आंबेडकर यांची पुण्यातील घरी भेट घेऊन मराठा आरक्षणाबरोबरच विविध प्रश्नांवर चर्चा केली. त्यानंतर त्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. प्रकाश आंबेडकर Prakash Ambedkar म्हणाले, आरक्षणासाठी खूप प्रतिकूल आहे. पण आम्ही प्रयत्न करणार आहोत. खासदार छत्रपती संभाजीराजे यांची भूमिका राजकीय नाही. भाजपचा आरक्षणाला विरोध असल्याचे ते म्हणाले.

प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले, चर्चेच्या दरम्यान असं ठरलं की आरक्षणाचा प्रश्न पुढं घेऊन जायचा असेल सत्तेचा गाभा असायला हवा. आरक्षणाचे पुरावलोकन करायचं असेल तर पुनर्विचार याचिका करता येते. पण राज्यसत्ता असेल तर राज्यपालांच्या माध्यमातून देखील आपण पुनरावलोकन करु शकतो. त्यासाठी राज्यसत्ता हवी. राजसत्तेशिवाय हा प्रश्न सुटणार नाही. आरक्षणासाठी परिस्थिती खूप प्रतिकूल आहे. पण आम्ही प्रयत्न करणार आहोत, असे ते म्हणाले.

शरद पवारांचे राजकारण नारो वा कुंजरोवा प्रमाणे
प्रकाश आंबेडकर म्हणाले, शरद पवार पवारांचे राजकारण नेहमी नरो वा कुंजरोवा अशाप्रकारचे राहिले आहे. पण शरद पवार इथून पुढे स्पष्ट भूमिका घेतील अशी अपेक्षा आहे. ओबीसी आरक्षण रद्द करण्याचा आज झालेला निर्णय कायदेशीर आहे असं मी मानत नाही. ओबीसी आरक्षण अझमशन बेस्ड आहे, असेही ते म्हणाले.

Also Read This : 

दलित समाजाबद्दल जातीवाचक वक्तव्य; ‘तारक मेहता’ फेम अभिनेत्रीवर FIR

Video : पुण्यात नाकाबंदीमध्ये ट्रॅफिक पोलिसानं दुचाकी थांबवली ! दुचाकीस्वारानं फरफटत नेल्यानं पोलिस हवालदार जखमी; व्हिडीओ CCTV मध्ये कैद

राज्यातील ‘या’ 21 जिल्ह्यात पॉझिटिव्हिटी रेट जास्त; 15 दिवसांचा ‘लॉकडाऊन’ वाढणार