Maratha Reservation | मराठा आरक्षणासाठी आणखी २ आत्महत्या, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाने संपवले जीवन

छत्रपती संभाजीनगर / संगमनेर : राज्यभर मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनाचा वणवा पेटला आहे. मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांच्या आमरण आंदोलनाचा आज सातवा दिवस आहे. तर दुसरीकडे मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करण्याचे दुर्दैवी सत्र अजूनही सुरूच आहे. मागील काही तासात दोन आत्महत्यांची नोंद झाली आहे. संगमनेर तालुक्यात एका तरूणाने गळफास (Maratha Protest Suicide) घेतला. तर दुसरी घटना छत्रपती संभाजीनगर येथे घडली आहे. या दोन आत्महत्यांनी सर्वत्र खळबळ उडाली आहे. (Maratha Reservation)

आज पहाटेच्या सुमारास संगमनेर तालूक्यात सागर वाळे (वय२५) या तरूणाने घराच्या मागे असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये गळफास घेत आत्महत्या केली. सुसाईड नोटमध्ये सागरने लिहिले आहे की, आम्ही जातो आमच्या गावा आमचा रामराम घ्यावा, आरक्षण नसल्यामुळे आत्महत्या करत आहे. (Maratha Reservation)

दुसरी घटना छत्रपती संभाजीनगर येथील आहे. संभाजीनगरमधील पोखरी, कोलठान येथील २३ वर्षीय शुभम अशोक गाडेकर
याने आरक्षणासाठी झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. शुभम एमपीएससीची तयारी करत होता. त्याच्या पश्चात एक मोठा भाऊ आई-वडील आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Manoj Jarange Patil | मनोज जरांगेंचे आमदार, खासदारांना आवाहन, राजीनामे नको, मुंबईतच थांबा, सांगितली ‘ही’ नवी रणनिती

Pune Crime News | मांजरी गॅस सिलेंडर स्फोट प्रकरणात 4 जणांवर FIR, गोडाऊन मालकाला अटक

Praneti Lavange Khardekar | प्रणेती लवंगे खर्डेकर यांची नागपूर जिल्ह्यासाठी मानद वन्यजीव रक्षक म्हणून नियुक्ती