मराठा समाजाचे जलसमाधी आंदोलन

सांगली :पोलीसनामा  ऑनलाईन

काकासाहेब शिंदे या तरूणाने मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जलसमाधी घेतली. त्याच्या निषेधार्थ सांगलीत बुधवारी कृष्णा नदीत जलसमाधी आंदोलन करण्यात आले. यावेळी शासनाने आंदोलन न दिल्यास येत्या निवडणुकीत धडा शिकवण्याचा इशारा आंदोलकांतर्फे देण्यात आला. यावेळी शिंदे यांचे बलिदान व्यर्थ जाऊ न देण्याची शपथ घेण्यात आली.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मंगळवारपासून जिल्ह्यात आंदोलनाची तीव्रता वाढली आहे. मंगळवारी पुकारलेल्या बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनही करण्यात आले. बुधवारी मराठा क्रांती मोर्चातर्फे कृष्णा नदीत जलसमाधी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर माई घाटावर सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
[amazon_link asins=’B075XRCGMS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’14d467ee-8fe4-11e8-8ffa-8f026b4988ea’]

सकाळी साडेदहाच्या सुमारास आंदोलक श्री. स्वामी समर्थ मंदिराजवळ जमा झाले. त्यानंतर घोषणाबाजी करत आंदोलनाला सुरूवात करण्यात आली. पन्नासहून अधिक कार्यकर्त्यांनी जलसमाधी घेतली. यावेळी आरक्षणासाठी काकासाहेब शिंदे यांनी बलिदान दिले आहे. आरक्षण मिळेपर्यंत आंदोलनाची धार कमी करण्यात येणार नाही. कोणत्याही परिस्थितीत आरक्षण मिळवणारच. शिंदे यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही अशी शपथ घेण्यात आली.

यावेळी डॉ. संजय पाटील, नितीन चव्हाण, महेश खराडे, सतीश साखळकर, अविनाश जाधव, श्रीरंग पाटील, शिवराज पाटील, अरूण कणसे, राहुल पाटील, योगेश पाटील, संभाजी पोळ, आसिफ बावा आदी उपस्थित होते.

[amazon_link asins=’B07CQ4XZ9C’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a47226cd-8fe4-11e8-81af-b123c8411672′]

अतिरिक्त पोलिस अधीक्षक शशिकांत बोराटे, उपअधीक्षक अशोर विरकर, पोलिस निरीक्षक रविंद्र डोंगरे, रविंद्र शेळके यांनी आंदोलनस्थळी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. सुमारे तासभर प्रतिकात्मक जलसमाधी घेतल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.