मराठा विद्यार्थ्यांचे आंदोलन १५ दिवसानंतर मागे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठीही मराठा आरक्षण लागू राहावे, यासाठी गेल्या १५ दिवसांपासून आझाद मैदानावर सुरु असलेले मराठा विद्यार्थ्यांचे आंदोलन आज सकाळी मागे घेण्यात आले आहे. सरकारने काढलेल्या अध्यादेशावर राज्यपालांनी स्वाक्षरी केल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. पी जी मेडिकल प्रवेशाबाबत कॅनिबेट निर्णयानंतर एसईबीसी आरक्षणाच्या राज्य सरकारच्या अध्यादेशावर राज्यपाल सी विद्याासागर राव यांनी सोमवारी सही केली. त्यामुळे आता पी जी प्रवेशाला आणि एमबीबीएस प्रवेशाला मराठा आरक्षण लागू होणार आहे. असे असले तरीही खुल्या प्रवर्गाने या निर्णयाविरोधात न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. आपले आंदोलन मागे घेताना विद्यार्थ्यानी राज्यपालांना एक पत्रही पाठविले आहे.

आम्ही सर्व डॉक्टर मागील १५ दिवसांपासून आझाद मैदान येथे आमच्यावर कळत नकळत झालेल्या अन्याया विरुद्ध लढत आहोत. आम्ही ह्या गोष्टीची दक्षता घेतली की आमचा आवाज हा महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यात पोहोचवा व ते आम्ही एका परीने केले देखील. आझाद मैदान येथे क्रांती घडते हे ऐकले होते, तसेच आज अनुभवले देखील.

आम्ही महाराष्ट्र शासनाचे अत्यंत आभारी आहोत की त्यांनी आमची बिकट परिस्थिती पाहून योग्य तसा निर्णय घेऊन राजपत्रक जाहीर केले. आता फक्त एकच अपेक्षा आहे की हे राजपत्रक व मराठा आरक्षण काळाच्या व न्यायालयाच्या कसोटीत टिकावे व तशीच आमची राज्यसरकारला विनंती देखील आहे.

हे धाडसाचे कार्य कोणा एकाच्या बळावर पार पाडणे असंभव होते, त्याच अनुषंगाने काही आदरणीय व्यक्तिमत्त्वांचा विशेष उल्लेख असणे गरजेचे आहे.

आदरणीय, राज्यपाल साहेब श्री विद्यासागर रावजी ह्यांचे विशेष आभार.
मुख्यमंत्री साहेब श्री देवेंद्र फडणवीसजी ह्यांचे विशेष आभार.
शरद पवार साहेब ह्यांचे आभार,
गिरीश महाजन साहेब, चंद्रकांत पाटील साहेब, प्रवीण दरेकर साहेब, सुप्रिया ताई, अजित पवार साहेब, भाई जगताप साहेब, नितेश राणे साहेब, जयंत पाटील साहेब, हुसैन दलवाई साहेब, डॉक्टर जे. टी पोल साहेब, संभाजी महाराज, हर्षवर्धन जाधव साहेब, जितेंद्र आव्हाड साहेब ह्या सर्व दिग्गजांचे मन:पूर्वक आभार.

आमचे आधार स्तंभ असलेले व्यक्ती म्हणजेच आमचे मराठा बांधव व भगिनी, समस्त मराठा समन्वयक, आबा पाटील साहेब, वीरेंद्र पवार साहेब, छावा संघटना, संभाजी ब्रिगेड, जगभरातील संपूर्ण मराठा समाज, सर्व पोलिस बांधव व स्टाफ, सर्व पत्रकार बंधू- भगिनी, डिजिटल मीडिया हाऊसेस.

तुमच्या सर्वांच्या अखंड पाठिंब्यावर आम्ही आज इथे टिकून राहिलो व असच आपला आशीर्वाद व आपलं प्रेम आम्हाला मिळावं हीच सदैव इच्छा. गरज पडल्यास आम्ही देखील त्याच जिद्दीने आपल्या सोबत उभे राहू असा शब्द आम्ही देतो.
आता वेळ आलेली आहे की आम्ही ज्या कार्य साठी एवढा जीवाचा अटा पिटा केला त्या आमच्या सेवेच्या कर्तव्यावर रूजू व्हावं. तर दिनांक २१ मे २०१९ रोजी आम्ही आमचं आंदोलन यशस्वी रित्या संपवत आहोत, ह्याच एका आशेवर की परत मराठा बांधवांना आझाद मैदान येथे येण्याची गरज भासणार नाही.
तर वेळ आलेली आहे की आम्ही आता आमचे स्तेथिस्कोप व पांढरा कोट घेऊन आमचे पवित्र असलेले असे कर्तव्य परत सुरू करावे.
धन्यवाद.