Happy Birthday Ashok Saraf : ‘या’ कारणामुळे अशोक सराफ यांना म्हणतात ‘मामा’

ADV

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मराठी चित्रपट सृष्टीतील एक प्रेरणादायी आणि त्याचबरोबर सगळ्यांना हसविणारा अभिनेता अशोक सराफ यांचा आज वाढदिवस आहे. यांनी मराठीबरोबरच हिंदी चित्रपटात दमदार अभिनयाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त एक गोष्ट समोर आली आहे. ती म्हणजे अशोक सराफ यांना नावाने हाक न मारता सगळेजण त्यांना ‘मामा’ म्हणतात. त्यांना मामा म्हणण्याचे कारण वाढदिवसानिमित्त सगळ्यांना समजणार आहे.

प्रसिद्ध अभिनेता अशोक सराफ यांनी मराठी चित्रपट आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. आजही त्यांचा प्रत्येक चित्रपट लोक आवडीने पाहतात. प्रत्येक चित्रपटात त्यांनी विनोद करुन चाहत्यांना खळखळून हसविले आहे. त्यांचा चित्रपट पाहताना अजिबात कंटाळा येत नाही. अनेकजण अशोक सराफ यांना मामा म्हणतात. मामा म्हणण्यामागे खरे कारण हे आहे.

ADV

याबाबत अशोक सराफ यांनी सांगितले की, ‘चित्रपट आणि मालिका असा प्रवास करत असताना मला मामा हे नाव पडले. यामागे एक गोष्ट आहे. ती म्हणजे काही वर्षांपूर्वी एका चित्रपटाच्या सेटवर प्रकाश शिंदे नावाचा कॅमेरामॅन होता. तो अनेकवेळा त्याच्या मुलीला सेटवर घेऊन येत असे. त्यावेळी तिने माझ्याकडे बोट दाखवून हे कोण? असे त्या कॅमेरामॅनला विचारले. त्यावेळी प्रकाशने तिने सांगितले की, हे अशोक मामा आहे. तू त्यांना ‘अशोक मामा’ म्हणायचे. तेव्हापासून ती मला मामा म्हणू लागली. आणि तिच्यामुळे सेटवर सगळे मला मामा म्हणूनच हाक मारु लागले. आणि आजही मला अनेकजण मामा म्हणूनच हाक मारतात’.

अशोक सराफ हे मुळचे बेळगावमधील आहे. त्यांनी वयाच्या १८ वर्षी शिरवाडकरांच्या ‘ययाती आणि देवयानी’ या नाटकामधून रंगभूमिमध्ये पदार्पण केले. अशोक सराफ हे विनोदामधून सगळ्या चाहत्यांमा खुप हसवितात. पण प्रत्यक्ष मात्र त्यांना जास्त गप्पा मारायला आवडत नाही.