ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल लवकरच साकारणार ‘काळूबाई’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – मराठी अभिनेत्री अलका कुबल आठल्ये नुकत्याच धुरळा सिनेमात दमदार अभिनय करताना दिसल्या होत्या. यानंतर लवकरच आता त्या लहान पडद्यावर दिसणार आहेत. लवकरच त्या एका मालिकेतून चाहत्यांच्या भेटीला येणार आहेत. आई माझी काळूबाई असं या मालिकेचं नाव आहे. चाहत्यांना ही बातमी कळाल्यापासून त्यांची उत्सुकता अधिकच वाढली आहे.

अलका कुबल यांनी स्वत: त्यांच्या आगामी मालिकेबद्दल माहिती दिली आहे. आई माझी काळूबाई या मालिकेचा टीजर त्यांनी त्यांच्या इंस्टावरून शेअर केला आहे. टीजरमध्ये त्यांच्या भूमिकेविषयी देखील सांगण्यात आलं आहे. त्यांचा लुक ॲक्ट्रॅक्टीव आहे. अलका कुबल काळूबाईच्या भूमिकेत दिसणार आहेत. चाहत्यांसाठी नक्कीच ही आनंदाची बातमी आहे. टीजर शेअर करताना त्या म्हणतात, “काळूबाईच्या नावानं चांगभलं. लवकरच फक्त सोनी मराठीवर. आई माझी काळूबाई.” मालिकेचा टीजर पाहून चाहत्यांची उत्सुकता आणखीच वाढली आहे.

अलका कुबल यांनी काळूबाईच्या नावानं चांगभलं या सिनेमातही काळूबाईची भूमिका साकारली होती. यानंतर काही लोक चक्क त्यांच्या पाया पडू लागले, खास करून स्त्रिया. यानंतर त्यांनी अशा भूमिका करणं थाबवलं होतं.

अलका यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर अलका यांनी अनेक मराठी सिनेमा आणि मालिकेत काम केलं आहे. अलीकडेच त्या धुरळा सिनेमात दिसल्या आहेत. अलका कुबल मराठी फिल्म इंडस्ट्रीतील खूप मोठं नाव आहे. त्यांनी दर्शन या मालिकेतही काम केलं आहे. या मालिकेतून त्यांनी महाराष्ट्रातील मंदिरांची सफर घडवली होती.