‘या’ अविवाहित मराठी अभिनेत्रीचा प्रेग्नंट असतानाचा फोटो सोशलवर झाला होता व्हायरल, ‘हे’ होतं कारण !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन सध्या एका मराठी अभिनेत्रीच्या फोटोनं सोशलवर खळबळ माजवली आहे. फोटोमध्ये ही मराठी अभिनेत्री प्रेग्नंट असल्याचं दिसत आहे. कारण ही अभिनेत्री अद्याप अविवाहित आहे हे सर्वांनाच ठाऊक आहे. हा फोटो पाहून अनेकांना धक्का बसला आहे. याचे कारण म्हणजे या प्रेग्नंट दिसणाऱ्या मराठी अभिनेत्रीचं नाव आहे पूजा सावंत. तसं पाहिलं तर पूजाचा हा फोटो जुनाच आहे. परंतु अचानक हा फोटो आता सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे.

पूजाचा हा फोटो दोन वर्षांपूर्वीचा आहे. जेव्हा हा फोटो समोर आला होता तेव्हा अनेकांनी वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले होते. काही दिवसांनी या फोटोमागील सत्यही समोर आलं होतं. पूजानं सिनेमाच्या प्रमोशनसाठी ही स्टाईल वापरली होती. ही स्टाईल अभिनेत्री विद्या बालनची आहे. विद्याही कहानी या सिनेमासाठी प्रेग्नंट बनत मुंबईच्या टॅक्सीत फिरली होती, आणि सिनेमाचं प्रमोशन केलं होतं. पूजानंही सेम विद्या बालन स्टाईल वापरत सिनेमाचं प्रमोशन केलं होतं.

सिनेमाच्या प्रमोशनसाठी विद्यानं वापरलेली स्टाईल पाहून अनेकांनी तिचं कौतुकही केलं होतं. तिचा हा हटके फंडा सर्वांनाच आवडला होता. दरम्यान पूजानं ज्या सिनेमासाठी हा सगळा खटाटोप केला तो सिनेमा 14 जुलै 2016 रोजी झाला होता. लपाछपी असं या सिनेमाचं नाव आहे.

View this post on Instagram

🌸Universe will re-arrange itself accordingly 🌸

A post shared by Pooja Sawant (@iampoojasawant) on

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like