मराठी माणसाने दुसऱ्यांसमोर हात पसरवणे बंद करा : नितेश राणे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रात मराठी चित्रपटाला हिंदी चित्रपटामुळे स्क्रीन मिळत नसल्याच्या वाद सुरु असतांनाच, ‘स्वत: चे सिनेमागृह उभे करुन मराठी माणसांनी दुसऱ्यांसमोर हात पसरवणे बंद केले पाहीजे. असा सल्ला आमदार नितेश राणे यांनी दिला.

लेखक पु. ल. देशपांडे यांच्या जीवनावर आधारित ‘भाई: व्यक्ती की वल्ली’ हा चित्रपट प्रदर्शित झाला असता हिंदी या सिंम्बा या हिंदी चित्रपटामुळे चित्रपटगृह मालकांनी मराठी चित्रपट दाखवण्यास नकार दिला. दरम्यान आमच्या देवगडमध्ये ‘सिंबा’बरोबर ‘भाई’ पण गाजणार ! दुसऱ्यांचे फोडण्यापेक्षा स्वत:चे सिनेमागृह उभे करुन मराठी माणसांनी दुसऱ्यांसमोर हात पसरवणे बंद केले पाहिजे. असा सल्ला आमदार नितेश राणे यांनी दिला. इतकेच नव्हे तर देवगडमधील स्टारलाइट सिनेमा येथील शो टाइमचे स्क्रीन शॉट ट्विटरवर शेअर केले आहेत.

विशेष म्हणजे  देवगडमधील स्टारलाइट सिनेमा येथे ‘सिम्बा’ आणि ‘भाई : व्यक्ती की वल्ली’ या दोन्ही चित्रपटांचे शो आहेत. ‘सिम्बा’चे दुपारी 12 आणि तीन वाजताचा शो आहे. तर ‘भाई: व्यक्ती की वल्ली’ या चित्रपटाला प्राइम टाइम देण्यात आला आहे. या चित्रपटाचे शो संध्याकाळी सहा आणि रात्री नऊ वाजताचे आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us