Pune Police Marathon | ‘दि अ‍ॅडिक्शन अँड वुमन्स सेफ्टी’ मॅरेथॉन स्पर्धेत पुणे पोलिसांसोबत धावले 750 पुणेकर

पुरुष गटात विठ्ठल कारंडे तर महिला गटात उपासना चौधरी प्रथम

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police Marathon | शासनाच्या उपक्रमांतर्गत अंमली पदार्थ दि-अ‍ॅडिक्शन (Drug De-Addiction) व वुमन्स सेफ्टी (Womens Safety) च्या अनुषंगाने समाजात जनजागृती करण्यासाठी पुणे पोलिसांकडून रविवारी (दि.6) मॅरेथॉनचे (Pune Police Marathon) आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 700 ते 750 स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेत पुरुष विभागातून विठ्ठल कारंडे तर महिला विभागातून उपासना चौधरी यांनी प्रथम क्रमांक पटकावला.

मुंढवा पोलीस ठाण्याच्या (Mundhwa Police Station) हद्दीत 10 किमी मॅरेथॉनचे आयोजन (Pune Police Marathon) करण्यात आले होते. पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), सह पोलीस आयुक्त संदीप कर्णीक (IPS Sandeep Karnik) यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा (IPS Ranjan Kumar Sharma), पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 विक्रांत देशमुख (DCP Vikrant Deshmukh), सहायक पोलीस आयुक्त अश्विनी राख (ACP Ashwini Rakh) यांच्या सहकार्याने व सुचने प्रमाणे अजय देसाई (Ajay Desai) यांच्या ब्लू ब्रिगेड रनिंग क्लब (Blue Brigade Running Club) यांनी स्पर्धेचे आयोजन केले होते. यावेळी RJ तरुण यांनी सूत्रसंचालन करुन कार्यक्रमाची रंगत वाढवली.

या स्पर्धेत 700 ते 750 स्पर्धकांनी भाग घेतला होता. ही स्पर्धा सकाळी 7 वाजता मुंढवा पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या मशाल रन ने सुरु झाली. सहायक पोलीस आयुक्त अश्विनी राख यांच्या हस्ते फ्लॅग ऑफ (Flag Off) करुन स्पर्धेला सुरुवात झाली. ही स्पर्धा वेस्टीन हॉटेल, एबीसी रोड कोरेगाव पार्क (Westin Hotel, Koregaon Park) येथून सुरु होऊन हडपसर मगरपट्टा सिटी (Hadapsar Magarpatta City) येथून पुन्हा वेस्टील हॉटेल येथे येऊन समाप्त झाली.

स्पर्धेतील विजेत्यांना रंजनकुमार शर्मा व अश्विनी राख यांच्या हस्त पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी रंजनकुमार शर्मा यांनी स्पर्धेचे कौतुक करत महिला सुरक्षा व अंमली पदार्थ, व्यसन विरोधात उपस्थितांना मार्गदर्शन केले. स्पर्धेच्या आधी पूजा जैन (Pooja Jain) यांनी झुंबा डान्सचे (Zumba Dance) प्रात्यक्षिक करुन स्पर्धकांचा वॉर्म अप करुन घेतला. तर डॉ. श्रेया राजगिरे (Dr. Shreya Rajgire) यांनी व त्यांच्या टीमने फिजिओ थेरपी राधा कुलकर्णी (Radha Kulkarni) यांनी स्पर्धकांकडून योगासने करुन घेतले. यावेळी सह्याद्री हॉस्पिटलने (Sahyadri Hospital) कार्डियाक अॅम्ब्युलन्स (Cardiac Ambulance) उपलब्ध करुन दिली. तर राहुल जाधव यांनी अंमली पदार्थ व व्यसन याबाबत मार्गदर्शन केले. एव्हरेस्ट वीर तसेच 5 वेळा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड (Guinness Book of World Records) करणाऱ्या प्रीती म्हस्के (Preeti Mhaske) यांनी व्यायमाचे फायदे सांगितले. तसेच फिटनेस कोच विजय गायकवाड (Fitness Coach Vijay Gaikwad) यांनी देखील व्यायामाचे फायदे उपस्थितांना सांगितले.

ही स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी ब्लू ब्रिगेड टीम तसेच मुंढवा पोलीस ठाण्याचे
वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे (Sr PI Vishnu Tamhane), सहायक पोलीस निरीक्षक समीर कपरे (API Sameer Kapre), संदीप जोरे (API Sandeep Jore), पोलीस उपनिरीक्षक गणेश कुलाळ (PSI Ganesh Kulal), प्रमोद कोळेकर (PSI Pramod Kolekar), पोलीस अंमलदार तानाजी देशमुख, निलेश पालवे, रविंद्र देवढे, शितल काळे, शुभांगी तारु, राजश्री लडकत व इतर अधिकारी अंमलदार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या स्पर्धेसाठी पुनीत बालन ग्रुप (Punit Balan Group), पंचशील ग्रुप (Panchshil Group), हॉटेल वेस्टीन, सह्याद्री हॉस्पिटल यांनी विशेष सहकार्य केले.

स्पर्धेतील विजेते खेळाडू

पुरुष विभाग

  1. प्रथम क्रमांक – विठ्ठल कारंडे (वेळ 41.08 मिनिट)
  2. द्वितीय क्रमांक – संदीप पांडूळे (वेळ – 42.57 मिनिट)
  3. तृतीय क्रमांक – सार्थक जिपाटे (वेळ 43.00 मिनिट)

महिला विभाग

  1. प्रथम क्रमांक – उपासना चौधरी (वेळ 58.00 मिनिट)
  2. द्वितीय क्रमांक – वसंती ढमढेरे (वेळ – 59.00 मिनिट)
  3. तृतीय क्रमांक – चंद्रभागा कचरे (वेळ 60.00 मिनिट)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Jejuri Fort Development Plan | जेजुरी गड विकास आराखडा पहिला टप्प्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

Devendra Fadnavis On Ajit Pawar | अजित पवार तडफदार उपमुख्यमंत्री, त्यांच्या येण्याने कामाचा वेग वाढला; फडणवीसांकडून कौतुक (व्हिडीओ)