कट्टर हिंदूत्त्ववाचं मराठवाडा कनेक्शन

औरंगाबाद : पोलीसनामा आॅनलाईन
यापुर्वी देखील आयसिस, सीमी, यासारख्या दहशतवादी संघटनांची पाळंमुळं संताची भूमी म्हणून अोळख असलेल्या मराठवाड्यापर्यंत पोहचलेली दिसून आली आहेत. आणि आता पुन्हा एकदा नव्याने कट्टर हिंदूत्त्ववाचं मराठवाडा कनेक्शन पुढं आलं आहे. अवैध शस्त्रे आणि स्फोटकं बाळगल्या प्रकरणी दहशतवाद विरोधी पथकाने नालासोपाऱ्यातील वैभव राऊतला अटक केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली. यानुसार कारवाई करत राज्याच्या विविध भागातून अनेकांना एटीएसने ताब्यात घेण्यातलं आहे. दिवसेदिवस या प्रकरणाची व्याप्ती वाढताना दिसत असून, अनेक व्यक्तींची नावे समोर येत आहे.

[amazon_link asins=’B075YPRB3Q’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’fe957a7c-a483-11e8-b9e6-3b2fef88c712′]

मराठवाड्याची राजधानी असलेल्या आैरंगाबादपासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या केसापुरी गावच्या शरद कळसकरला नालासोपाऱ्यात सापडलेल्या शस्त्रसाठा प्रकरणी अटक झाली आणि केवळ 25 घरांचं खेडं असलेलं केसापुरी गाव राज्यभर चर्चेत आलं. त्याच्या पाठोपाठच आैरंगाबादच्या जुन्या शहरातून त्याचा मित्र सचिन अंदुरेला अटक करण्यात आली. याच प्रकरणात जालन्यातून श्रीकांत पांगारकर याला एटीएसने गजाआड केलं आणि पुर्वी दहशतवादी कारवायासाठी सीमी, आयसिसचं स्लीपर सेल म्हणून अोळखला जाणारा मराठवाडा दहशतीच्या माध्यमातून एटीएस, सीबीआयच्या रडारवर आला.
एटीएसने पकडलेल्या सरद कळसकरचा मित्र सचिन अंदुरे यानेच अधंश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष डाॅ. नरेंद्र दाभोळकर यांच्यावर गोळ्या झाडल्याचा दावा सीबीआयने कोर्टात केला. यापुर्वी देखील मराठवाड्यातल्या काही हिंदूत्त्ववादी संघटनांवर दहशतवादाचे आरोप झाले आहेत. नोव्हेंबर 2002 साली आैरंगाबाद शहरातील निराला बाजारमध्ये पाईप बाॅम्ब ब्लास्ट झाला होता. तर तिकडे खडकेश्वर भागात एक जिवंत बाॅम्ब मिळाला होता. याच्या पाठिमागे कट्टर हिंदूत्त्ववादी संघटनांचा हात असल्याची चर्चा होती.
[amazon_link asins=’B076H51BL9′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’05f85835-a484-11e8-ad2e-6b2203303dbf’]

या दहशतवादी कारवायांची दाहकता नांदेड शहरापर्यंत देखील पोहचली होती. सन 2006 साली नांदेड शहरात बाॅम्ब तयार करताना स्फोट होवून, यामध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला होता. यावेळी देखील याच्या पाठिमागे काही हिंदूत्त्ववादी संघटना असल्याचा दावा पोलिसांनी केला होता.
आत्मघातकी हल्ल्याची तयारी करणे, हल्ल्यासाठी शस्त्रस्त्रे बाळगणे, स्फोटकं तयार करणे, अशा विविध आरोपाखाली मराठवाड्यातील तिघांना एटीएस व सीबीआयने ताब्यात घेतल्यामुळे मराठवाडा पुन्हा एकादा दहशतवादी कारवायांमुळे उजेडात आला असून, दाभोलकरांच्या हत्येमागे पुन्हा एकदा मराठवाडा कनेक्शन असल्याचं समोर आलं आहे.
[amazon_link asins=’B07B6DM75J’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’18715924-a484-11e8-a376-810e12d9201a’]