सासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन

दिघी येथे जागा घेण्यासाठी पैसे लागत असल्याने विवाहितेचा सासरच्या लोकांनी मानसिक आणि शारीरिक छळ केला. या छळाला कंटाळून विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.
[amazon_link asins=’B06Y5L25M4,B06Y5FYBKP’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’84f50a5e-b83c-11e8-8e0e-a516a4623524′]

याप्रकरणी विवाहितेच्या वडिलांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. तर अब्दुल उस्मान शेख (२५), सासरा उस्मान आझम शेख, सासू हूरा उस्मान शेख, दीर आमीन उस्मान शेख, रुकसार उस्मान शेख (सर्व रा. गंधर्वपार्क, काळजेवाडी, च-होली बुद्रुक, ता. हवेली) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इरफाना आणि अब्दुल यांचे  २३ एप्रिल २०१८ रोजी लग्न झाले. लग्नामध्ये इरफाना हिच्या वडिलांनी तीन तोळे सोन्याचे दागिने दिले होते. लग्नानंतर इरफाना हिच्या सासरच्या मंडळींनी पुण्यामध्ये जमिनीचा प्लॉट खरेदी केला. त्या प्लॉटचे पैसे देण्यासाठी सासरच्या लोकांनी इरफानाचे दागिने विकण्याचे ठरविले. त्यासाठी इरफाना हिने नकार दिला. त्यावरून सासरच्या लोकांनी तिला वारंवार मारहाण केली. तसेच तिचा मानसिक व शारीरिक छळ केला.
[amazon_link asins=’B00NJ2M33I,B017HSSHS4′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’8c2fa053-b83c-11e8-bf8f-0b2fe0ae18ef’]

या त्रासाला कंटाळून तिने सोमवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास छताच्या आढ्याला साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यावरून इरफाना हिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी सासरच्या लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास दिघी पोलीस करत आहेत.

पोलीसनामा ऑनलाईन : महत्वाच्या बातम्या एका क्लिकवर एकाच ठिकाणी