दोन बहिणींचा एकच पती ; असा झाला दोघींचाही संशयास्पद मृत्यू

लुधियाना: वृत्तसंस्था – लुधियाना जिल्ह्यातील तळवंडी गावात एका विवाहित महिलेचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला. या प्रकरणी विवाहतेच्या माहेरच्यांनी सासरच्यांवर खुनाचा आरोप लावला आहे. त्याला कारणही तसेच आहे. पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर युवकाने त्याच्या मेहुणीसोबतच दुसरे लग्न केले होते. लग्नानंतर तो बेल्जियमला निघून गेला. एक दिवस अचानक त्याने त्याच्या सासरी व्हिडीओ कॉल करून कॉलवर त्यांना सांगितले की, पत्नी रूपिंदर दार उघडत नाहीये. नेमकं काय झालं जाऊन पाहा वडील मंगत सिंग मुलीच्या सासरी जाण्याआधीच तिने जीव सोडला होता. तिच्या वडिलांनी आणि आईने सासरच्यांनीच तिला जाच करून हत्या केली अशी तक्रार पोलिसांत केली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पती धरमिंदर, सासरा, दीर आणि नंनद यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

‘या’ कारणामुळे तो सारखा जात होता बेल्जियमला…
मिळालेल्या माहिती नुसार, मंगत सिंग यांची मोठी मुलगी पिंकी हिचा विवाह 5 मार्च 2017 रोजी धरमिंदरसोबत झाला होता. लग्न झाल्यानंतर काही दिवसानंतर तो बेल्जियमला गेला. तेथे जावून एक दोन महिने उलटल्यानंतर पिंकीचा मृतदेह एका कालव्यात आढळला होता. त्यावेळी तीने आत्महत्या केली असे दर्शवण्यात आले आणि धरमिंदर याने पिंकीचिच लहान बहीण रूपिंदर हिच्याशी विवाह केला. पिंकीशी विवाह झाल्यानंतर देखील तो पुन्हा काही दिवसानंतर बेल्जियमला गेला.

वडील म्हणाले ‘या’ कारणामुळेच झाली दोघींचीही हत्या..
याप्रकरणी वडील मंगतसिंग यांनी सांगितले की, मुलीने सासरचे हुंड्यासाठी त्रास देत आहेत नकोनको ते टोमणे मारत आहेत असे आम्हाला सांगितले होते. एकदिवस अचानक धरमिंदरचा मला कॉल आला की, आणि तो म्हणाला रूपिंदर दार उघडत नाहीये तुम्ही जाऊन पाहता का काय झाले आहे ?. काय झाले हे पाहण्यासाठी मी घरी गेलो असता तिथे कोणीच नव्हते. तिचे सासरे एकटेच घरी असून ते देखील दारूच्या नशेत होते. तिला पाहण्यासाठी मी घरात गेलो मात्र, तोपर्यंत रुपिंदरने जीव सोडला होता. घरात या दोघांशिवाय कोणीही नव्हते. त्यांनीच रूपिंदर ला ठार मारले आणि माझी मोठी मुलगी पिंकी हिला देखील त्यांनीच मारून तिचा मृतदेह कालव्यात फेकुन दिला असा आरोप त्यांनी केला आहे.

मित्राकडून मैत्रिणीवर चाकूने सपासप वार
वर्षातील काही दिवस प्रौढ पुरुषांना सेक्स फ्री… महिला कार्यकर्त्याची राहुल गांधींवर चिरफाड टीका