शास्त्रज्ञांना मिळालं मोठं यश ; मंगळ ग्रहाच्या वातावरणात आढळला बाष्पाचा थर

पोलीसनामा ऑनलाइन टीम – मंगळ ग्रहावरील संशोधनामध्ये शास्त्रज्ञांना एक मोठं यश प्राप्त झालं आहे. तर वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार, एक्सोमार्सच्या मदतीने मंगळ ग्रहावरील वातावरणात बाष्पाचा पातळ थर आढळून आल्याचं संशोधन समोर आल्याची माहिती शास्त्रज्ञांनी दिली आहे. युरोप आणि रशियाच्या संयुक्त विद्यमानं कार्यरत असलेल्या सॅटलाइट एक्सोमार्स ट्रेस गॅस ऑरबिटरने शोध लावला आहे. या दोन्ही देशाच्या स्पेस एजंसीच्या वैज्ञानिकांनी हा एक आश्चर्यचकीत करणारा शोध लावला गेला आहे. त्या शोधात मंगळ ग्रहावर बाष्पाचा थर आढळून आला आहे.

युरोपची अंतराळ संशोधन संस्था आणि रशियाची अंतराळ संशोधन संस्थेने १४ मार्च २०१६ रोजी एक्सोमार्स ट्रेस गॅस ऑरबिटरचं यशस्वी उड्डाण केलं होतं. १९ ऑक्टोबर २०१६ रोजी हे एक्सोमार्स ऑरबिटरने मंगळाच्या कक्षेत प्रवेश केला होता. तेव्हापासून मंगळावरील सर्व गोष्टींवर संशोधन केलं जात आहे. तिथं अस्तित्वात असलेल्या विविध वायूंचं या उपग्रहामार्फत संशोधन करणं शक्य होत आहे. या संशीधनामुळे एकेकाळी मंगळावर जीनजीवन होतं असा तर्क बांधला जात आहे. तसेच या मंगळावर प्राचीन घाट माथ्यावर आणि नद्यांमध्ये एकेकाळी पाणी वाहत होतं, असा अंदाज या बाष्पाच्या अस्तित्वाच्या शोधानंतर व्यक्त केला जात आहे. मंगळावर मिळालेल्या पाण्याचे अस्तित्व हे आतापर्यंत बर्फ आणि जमीनीखालील पाण्याच्या स्वरुपात मिळालं आहे. मंगळाच्या वातावरणात बाष्पाचं प्रमाण आढळलं म्हणजेच या ग्रहावर पाणी आहे याला दुजोरी मिळतो.

एक्सोमार्सच्या मदतीनं मिळालेल्या माहितीचं विश्लेषण केल्यानंतर शास्त्रज्ञांना लक्षात आलं की, ज्यावेळी सूर्यकिरणं मंगळ ग्रहावरुन जातात तेव्हा या ग्रहावर असलेल्या बाष्पाचा थर स्पष्टपणे दिसून येतो. एक्सोमार्स सोबत पाठविण्यात आलेल्या नादिर अँड ऑक्लटेशन फॉर मार्स डिस्कव्हरी नावाच्या यंत्रानं हा शोध लावला आहे. तर नादिर अँड ऑक्लटेशन फॉर मार्स डिस्कव्हरी हे यंत्र सध्या मंगळ ग्रहाभोवती घिरट्या घेत आहे. मंगळावरील पाण्याचा साठा हळूहळू का नष्ट होत गेला याचीही शोध आता घेता येणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. बाष्प आढळलं याचा अर्थ मंगळावर पाणी देखील आहे. पण ते नेमकं कुठे? किती प्रमाणात आहे? हे आताच सांगणं शक्य नाही. पण मंगळावरील पाण्याचं अस्तित्व म्हणजे या ग्रहावर याआधी जनजीवन अस्तित्वात होतं हे दर्शविणारा मोठा शोध नक्कीच आहे, असं मनिष पटेल यांनी म्हटले आहे.

तसेच येथील मंगळाभोवतीच्या वातावरणात हायड्रोजन आणि ड्यूटीरियम देखील आहे. त्यामुळे इतिहासात या ग्रहावर पाणी होतं याची पुष्टी यातून होते. ड्यूटीरियममध्ये काही प्रमाणात पाण्याचा अंश असतो. सूर्याची किरण मंगळावर आल्यानंतर बाष्पाचा हलका थर वर उठतो आणि अंतराळात गायब होतो, असं मनिष यांनी सांगितलं. चीनने बुधवारी मंगळाच्या दिशेनं आपला एक उपग्रह यशस्वीरित्या पाठवला आहे. तर त्याच्या एकदिवस आधीच यूएईच्या होप मार्स मिशनच्या उपग्रहानं यशस्वीरित्या मंगळाच्या कक्षेत प्रवेश केला आहे. या शोधामुळे मंगळावरील जनजीवनाच्या शक्यतांना अधिक बळकटी मिळणार असल्याचं समजते.