एअर स्ट्राईकमध्येच मसूद अझहर मारला गेला ?

इस्लामाबाद : वृत्तसंस्था – जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहर मृत्यू झाल्याची बातमी नुकतीच समोर आली आहे. भारतीय वायू सेनेने केलेल्या एअर स्ट्राईकमध्येच मसूद अजहर मारला गेला आहे अशी शक्यता समोर येते आहे. पाकिस्तानचा पूर्व इतिहास पाहता मसूद एअर स्ट्राईकमध्ये मारला गेला असल्याची बातमी पाकिस्तान सरळ देणार नाही. कारण पाकिस्तानची त्यात खूप मोठी मानहानी झाली असती आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा अधिकच उंचावली असती म्हणूनच पाकिस्तानने एअर स्ट्राईकमध्ये मसूद मारला गेला असल्याची बातमी लपवून ठेवली असावी.

बालाकोट मध्ये ज्यावेळी भारताने हवाई हल्ला केला त्यावेळी जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी पुलवामा हल्ल्याचा विजय उत्सव करण्यासाठी एकत्र जमा झाले होते अशी माहिती भारतीय गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. जर पुलवामा हल्ल्याचा विजय उत्सव साजरा करण्यासाठी दहशतवादी एकत्र जमले होते. तर मग त्या दहशतवाद्यांचा नेता मसूद अझहर त्यावेळी त्यांचे आत्मबल वाढवण्यासाठी तेथे उपस्थित असल्याची शक्यता अधिक आहे. याच शक्यतेमुळे मसूद अझहर भारतीय वायू सेनेने केलेल्या वायू हल्ल्यात मारला गेला असावा.

मागील काही दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या एका मंत्र्याने मसूद खूप आजारी असल्याचे देखील म्हणले होते. मसूद आजारी आहे असे दर्शवून तो एक दिवस आजारपणात मृत झाला असे दाखवण्याची रणनीती पाकिस्तानने आखली असावी असे भारत-पाक संबंधातील जाणकारांनी म्हणले आहे.आता जर मसूद अझहर जिवंत आहे तर मग त्याचे पुरावे पाकिस्तान देणारा का हे देखील पाहण्या सारखे राहणार आहे. दरम्यान जेव्हा पुलवामा हल्ला झाला तेव्हापासून मसूद अझहर हा गायब असल्याचे भारतीय गुप्तचरांनी सांगितले होते. त्याला आयएसआयने रावळपिंडीत लष्करी संरक्षणात ठेवले होते असे देखील गुप्तचर यंत्रणांची सांगितले होते. एक शक्यता अशी हि आहे कि मसूद अझहर रावळपिंडीवरून पुलवामा हल्ल्याचा आनंद उत्सव साजरा करण्यासाठी बालाकोटमध्ये आला असावा आणि तेथेच तो एअर स्ट्राईक मध्ये तो मारला गेला असावा