मिरज रेल्वेस्थानकावरुन मांसाची तस्करी

मिरज : पोलीसनामा आॅनलाइन

मिरज रेल्वेस्थानकावरुन मांसाची तस्करी होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. कोल्हापूर – मनगूर एक्स्पेसने हैद्राबादकडे पाठवण्यासाठी आणलेले जणावरांचे मांस पोलीसांनी मिरज रेल्वे स्थानकात पकडले आहे. या प्रकरणी एका संशयीतास ताब्यात घेतले आहे. हे मांस तब्बल 30 हजार रुपये किमतीचे असून मोठ्या गाठोड्यांत बांधून आणले होते.

रेल्वे गाडीतुन बेकायदेशीररित्या मोठ्या जणावरांच्या मांसाची तस्करी होत असल्याची तक्रार ‘पीपल्स फाॅर अनिमल’ संघटनेकडून करण्यात आली होती. त्यानंतर रेल्वे पोलीसांनी ही कारवाई केली. याप्रकरणी मांसाची तस्करी करणाऱ्या विजयवाडा (आंध्रप्रदेश) येथील एका संशयीतास पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

सदर मांसाची पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी केल्यानंतर संशयीत गुन्हेगारांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान पवार यांनी दिली आहे.