आता कार्डचा ‘पासवर्ड’ लक्षात ठेवण्याची ‘कटकट’ संपली ! चेहरा किंवा अंगठा दाखवून करा ‘पेमेंट’, जाणून घ्या

नवी दिल्ली : आता एटीएम कार्ड चा वापर करताना पासवर्ड लक्षात ठेवण्याची कटकट संपली आहे. कारण मास्टरकार्ड ने ऑनलाईन शॉपिंग च्या अनुभवाला सोपे बनविण्यासाठी नवीन ‘आयडेंटिटी चेक एक्सप्रेस’ लॉन्च केले आहे. त्यामुळे आता याच्या मदतीमुळे ऑनलाइन शॉपिंग (Online shopping) चे पेमेंट चेहरा किंवा अंगठा दाखवून करता येणार आहे. मास्टरकार्ड ने ऑनलाइन शॉपिंग मधील फसवणुकीच्या वाढत्या घटना लक्षात घेऊन ग्राहकांना सुरक्षित पेमेंट (Safe payment) चा पर्याय दिला आहे. भारतात पहिल्यांदाच आयोजित झालेल्या ‘ग्लोबल मास्टरकार्ड सायबर सिक्योरिटी समिट’ मध्ये या ‘आयडेंटिटी चेक एक्सप्रेस’ ला प्रदर्शित केले गेले.

असे करणार काम :
आयडेंटिटी चेक एक्सप्रेस चा वापर करण्यासाठी ग्राहकांना आपल्या बँकेशी संपर्क करावा लागणार आहे. त्यानंतर या प्रोग्राम साठी ग्राहकांना नोंदणी करावी लागणार आहे. त्यानंतर आयडेंटिटी चेक साठी एक अ‍ॅप्लिकेशन डाउनलोड करावे लागेल.त्यानंतर तुम्ही जेव्हा ऑलनाइन शॉपिंग साइट वर शॉपिंग कराल तेव्हा तुम्हाला पेमेंट साठी आपला चेहरा किंवा बोट दाखवावे लागेल. म्हणजेच बायोमीट्रिक ऑथेंटिकेशन करावे लागेल त्यामुळे तुम्हाला पासवर्ड लक्षात ठेवण्याची गरज भासणार नाही.

सायबर अँड इंटेलिजेंस सॉल्यूशन मास्टरकार्ड चे प्रेसिडेंट अजय भल्ला यांना यासंदर्भात विचारले असता त्यांनी,”भारतीय ग्राहकाची वाढती क्रयशक्ती आणि आकांक्षांबरोबरच ई-कॉमर्स चा देखिल मोठ्या प्रमाणावर विकास होत आहे. आपल्या खास वैशिष्ट्यानुसार मास्टरकार्ड डिजिटल आर्थिक व्यवहारांची सुरक्षा वाढविण्यासाठी सातत्याने संशोधन करत असतो. आयडेंटिटी चेक एक्सप्रेस चा शुभारंभ खास ग्राहक आणि व्यापाऱ्यांसाठी आहे. कोणत्याही संशय आणि फसवणुकीशिवाय आर्थिक देवाणघेवाण व्हावी तसेच चेकआउट ची प्रक्रिया मजबूत आणि सोपी व्हावी याची खात्री मास्टरकार्ड देत आहे.’

आरोग्यविषयक वृत्त –